ICC U19 World Cup INDvsAUS: सेमीफायनलमध्ये यश धुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, दिलं 291 धावांचं लक्ष्य

भारताने अंडर 19 वर्ल्डकप (U 19 world cup) स्पर्धेच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 290 धावांचे डोंगरऐवढे लक्ष्य उभे केले आहे.

ICC U19 World Cup INDvsAUS: सेमीफायनलमध्ये यश धुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, दिलं 291 धावांचं लक्ष्य
yash dhull instagram
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 10:47 PM

गयाना: कर्णधार यश धुल (Yash dhull) आणि शेख राशिदच्या (Shaik Rasheed) दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने अंडर 19 वर्ल्डकप (U 19 world cup) स्पर्धेच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 291 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य उभे केले आहे. यश धुलने आज कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. त्याने (110) धावांची शतकी खेळी केली. शेख राशिदने (94) त्याला मोलाची साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. यश धुलने 110 चेंडूत 110 धावांची खेळी केली. त्याने 10 चौकार आणि एक षटकार लगावला. शेख राशिदने 108 चेंडूत 94 धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला सलामीवीर अंगक्रिष रघुवंशी (6) आणि हरनूर सिंह (16) यांनी निराशा केली. यश आणि राशिद फलंदाजीसाठी मैदानावर आले तेव्हा संघाच्या दोन बाद 37 धावा होत्या. त्यांनी एका कठीण परिस्थितीतून संघाचा डाव सावरला व मोठ्या लक्ष्यापर्यंत टीमला पोहोचवलं. भारताने निर्धारीत 50 षटकात पाच बाद 290 धावा केल्या. यश धुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर कोविडची लागण झाली. त्यामुळे पुढच्या दोन सामन्यांना तो मुकला. आज मात्र त्याने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. जबाबदारी ओळखून एका महत्त्वाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी साकारली.

कुठलाही ऑस्ट्रेलियन गोलंदाज यश धुलची विकेट घेऊ शकला नाही. राशिदने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या हाताला लागून स्टंम्पला लागला. यशने क्रीझ सोडल्यामुळे तो धावबाद झाला. काल सेमीफायनलचा पहिला सामना झाला. त्यात इंग्लंडने अफगाणिस्तानला नमवून अंतिम फेरी गाठली.

ICC U19 World Cup IND vs AUS semifinal match yash dhull hit century gave 291 target to australia

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.