IND vs BAN: CRPF जवानाच्या मुलाची कमाल, अंडर-19 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध विजयाचा ठरला हिरो

नवी दिल्ली: अंडर 19 वर्ल्डकप (Under 19 world cup) स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताने दिमाखात प्रवेश केला आहे. काल झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर (India vs Bangladesh) पाच विकेट राखून मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. त्यावेळी बांगलादेशने भारताला नमवून वर्ल्डकपच विजेतेपद मिळवलं […]

IND vs BAN: CRPF जवानाच्या मुलाची कमाल, अंडर-19 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध विजयाचा ठरला हिरो
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 10:19 AM

नवी दिल्ली: अंडर 19 वर्ल्डकप (Under 19 world cup) स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताने दिमाखात प्रवेश केला आहे. काल झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर (India vs Bangladesh) पाच विकेट राखून मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. त्यावेळी बांगलादेशने भारताला नमवून वर्ल्डकपच विजेतेपद मिळवलं होतं. भारताच्या कालच्या विजयामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने (Ravi kumar) महत्त्वपूर्ण योगदान दिलं. रवी कुमारने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये भन्नाट गोलंदाजी करुन बांगलादेशची वाट लावली. रवीने सात षटकात फक्त 14 धावा देत आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबुची वाट दाखवली. त्याने दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर माहफिजूल इस्लामचा विकेट काढला. त्याला चार चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या.

बांगलादेश सावरलाच नाही त्यानंतर रवीने सहाव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इफ्तिखार हुसैनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हुसैनला 17 चेंडूत फक्त एक रन्स करता आला. आठव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्रांतिक नावरोज नाबिलला आऊट करुन बांगलादेशला तिसरा झटका दिला. प्रांतिकने फक्त सात धावा केल्या. रवी कुमारने दिलेल्या धक्क्यांमधुन बांगलादेश शेवटपर्यंत सावरलाच नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. अखेर 111 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपला.

त्या चेंडूला तोड नव्हती येत्या दोन फेब्रुवारीला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलचा सामना होणार आहे. रवी कुमारचे वडिल सीआरपीएफमध्ये असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा रवी कुमारने पुरेपूर फायदा उचलला. रवी कुमारचा वेग आणि स्विंग गोलंदाजीचं बांगलादेशच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हतं. सलामीवीर माहफिजूल इस्लामला त्याने ज्या चेंडूवर बोल्ड केलं, ती गोलंदाजी पाहून त्याच्याकडून भविष्यात निश्चित मोठ्या अपेक्षा बाळगता येऊ शकतात.

ICC U19 World Cup Young pacer Ravi wreaks havoc against bangladesh in Quarter final match

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.