मोठी बातमी : प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेज आसीसीने (ICC) बदलाचे वारे काय असतात, हे दाखवून दिलंय. 1 जून रोजी दुबई येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसंच मोठे निर्णय घेण्यात आलेत. (ICC Want 14 team ODI World Cup And 20 team T20 World Cup)

मोठी बातमी : प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय
आयसीसीचा मोठी निर्णय
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 10:00 AM

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेज आसीसीने (ICC) बदलाचे वारे काय असतात, हे दाखवून दिलंय. 1 जून रोजी दुबई येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसंच मोठे निर्णय घेण्यात आले. 2019 एकदिवसीय विश्वचषक 10 संघांसह खेळल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पुन्हा एकदा 14 संघांसह वर्ल्ड कप खेळला जावा, अशा विचारात आहे. आयसीसी 14 संघांसह 2027 सालचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा विचारात आहे. त्याचबरोबर टी -20 वर्ल्ड कपच्या पुढील मोसमातील 20 संघांच्या फॉर्म्युलाला मान्यता देण्यात आली आहे. तर 2025 आणि 2029 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी 8 संघांदरम्यान खेळली जाईल. (ICC Want 14 team ODI World Cup And 20 team T20 World Cup)

आयसीसी बोर्डाच्या बैठकीशी संबंधित सूत्रांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, “आयसीसी बोर्डाने पुढच्या वर्ल्डकपवेळी 14 संघ खेळवण्याचा विचार केला आहे. क्रिकेटला प्रचार आणि प्रसार व्हावा, म्हणून आयसीसी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात आहे. 10 संघांसह वर्ल्ड कप खेळल्याने क्रिकेटला जागतिक स्तरावर पाहिजे तेवढी ग्रोथ मिळत नाहीय”.

वन डे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा सुपर सिक्स फॉरमॅट?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आयसीसीला पुन्हा वन डे वर्ल्ड कपमध्ये सुपर सिक्स फॉरमॅट परत आणायचा आहे. हा फॉरमॅट 1999 ते 2007 या दरम्यानच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवेळी होता. पण 2007 च्या विश्वचषकातून भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यानंतर तो फॉरमॅट बदलला गेला. त्यानंतर 2011 आणि 2015 च्या विश्वचषकात क्वार्टर फायनल खेळले गेले. एकदिवसीय सुपर लीगचा फायदा झाल्याचे आयसीसीने मान्य केले. यामुळे सहयोगी देशांपर्यंत क्रिकेटचा विस्तार करण्यास मदत झाली.

टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये 20 संघ

एकदिवसीय विश्वचषकातील 14 संघांच्या निर्णयानंतर आयसीसीने टी -20 विश्वचषकातही संघांच्या विस्तारास हिरवा कंदील दर्शवला आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार २2024 ते 2030 दरम्यान दर दोन वर्षांनी टी २० वर्ल्ड कप आयोजित केला जाईल. त्याशिवाय चॅम्पियन्स करंडक पुन्हा सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार आठ संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाईल आणि यात चार संघांचे दोन गट तयार केले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळले जातील.

(ICC Want 14 team ODI World Cup And 20 team T20 World Cup)

हे ही वाचा :

Virat kohli : विराटच्या अंड्यावरुन ट्विटरवर घमासान, शेवटी चाहते म्हणाले, ‘तू काय पण खा पण RCB ला कप जिंकवून दे!’

WTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा…, पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी

WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, ‘हा’ हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.