ICC WWC 2022: वेस्ट इंडिजने विजय अक्षरश: खेचून आणला, अनीसा मोहम्मदच्या ओव्हरमध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा ‘गेम’

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Womens world cup) बुधवारी वेस्ट इंडिजच्या महिला संघाने (West indies womens Team) रोमांचक विजय मिळवला.

ICC WWC 2022: वेस्ट इंडिजने विजय अक्षरश: खेचून आणला, अनीसा मोहम्मदच्या ओव्हरमध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा 'गेम'
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:50 PM

ऑकलंड: आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Womens world cup) बुधवारी वेस्ट इंडिजच्या महिला संघाने (West indies womens Team) रोमांचक विजय मिळवला. त्यांनी विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडच्या (England) महिला संघाला सात धावांनी हरवलं. वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या महिला संघाने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने धीम्या गतीने धावा जमवल्या. पण गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या महिला संघाने 50 षटकात 225 धावा केल्या. इंग्लंडचा संघ पूर्ण 50 षटकही खेळू शकला नाही. त्यांचा डाव अवघ्या 218 धावात आटोपला. इंग्लंडचा स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. याआधी पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लिश संघाला पराभूत केलं होतं.

दबावाच्या प्रसंगात कामगिरी उंचावली 

महिला वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाकडून थक्क करणारी कामगिरी सुरु आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने सर्वात आधी न्यूझीलंडच्या संघाला पराभूत केलं होतं. वेस्ट इंडिजने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 47.4 षटकात आटोपला. शेवटच्या षटकात इंग्लंडचा संघ विजयाच्या खूप निकट होता. पण वेस्ट इंडिजने एकाच षटकात दोन विकेट घेऊन इंग्लंडच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने शेवटच्या षटकांमध्ये दबावाच्या प्रसंगात कमालीचा खेळ उंचावला. संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून टाकलं.

शेवटच्या षटकात काय घडलं?

इंग्लंडच्या संघाला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी नऊ धावांची गरज होती. त्यांचे दोन विकेट शिल्लक होते. एक्लेस्टोन 32 आणि क्रॉस 27 धावांवर नाबाद होती. वेस्ट इंडिजने ऑफ स्पिनर अनीसा मोहम्मदला चेंडू सोपवला. इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता. पण 48 व्या षटकात सामन्याचं सर्व चित्रंच पालटलं. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक्लेस्टोनने जोरदार फटका मारला. पण तो थेट अनीसा मोहम्मदच्या हातात गेला. एक्लेस्टोन आऊट झाली. त्यानंतर 48 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनीसा मोहम्मदने स्टाइकवर असलेल्या शर्बसोलला क्लीन बोल्ड केलं. शर्बसोलने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तिची चूक झाली. ती बोल्ड झाली. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने हा सामना सात धावांनी जिंकला व ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.