ICC Women’s world cup 2022 : भारतीय संघासमोर उपांत्य फेरीचा मार्ग कठीण, तरीही विजयाचं लक्ष्य सोपं, काय आहे यशाचं समीकरण?
महिला विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत चार सामने खेळला आहे. त्यापैकी दोन सामन्यात भारतीय महिला संघाला यश मिळालं आहे. तर दोन सामन्यात महिला संघाचा पराभव झाला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. तरीही भारताला उपांत्य फेरी गाठता येऊ शकते. पुढील तीन सामन्यांमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसोबत होणार आहे.
महिला विश्वचषकात (ICC Women’s world cup 2022) भारतीय संघ आतापर्यंत चार सामने खेळला आहे. त्यापैकी दोन सामन्यात भारतीय महिला संघाला (Indian Women Team)यश मिळालं आहे. तर दोन सामन्यात महिला संघाचा पराभव झाला. इंग्लंडविरुद्धच्या (England women team) पराभवानंतर भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. तरीही भारताला उपांत्य फेरी गाठता येऊ शकते. पुढील तीन सामन्यांमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसोबत होणार आहे. बांगलादेशविरुद्ध भारत सहज विजय मिळवू शकतो, मात्र ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अजिंक्य आहेत.
भारतीय संघाला पराभवाचा सामना
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर 3 सामने गमावलेल्या इंग्लंडने हा सामना 4 गडी आणि 112 चेंडू राखून जिंकत स्पर्धेतील पहिल्या विजय मिळवला. मागच्या सामन्यात शतकी खेळी करणारी स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 134 धावांवर रोखल्यानंतर 31.2 षटकांमध्ये आव्हान पूर्ण केलं होतं. या लढतीतील पराभवानंतरही भारतीय संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान राखले आहे. भारतीय संघाचे 4 सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह चार गुण आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषने 33 धावांची खेळी केली. भारतानं इंग्लंडकडून चार्ली डीननं 233 धावांत 4 आणि आन्या श्रुबसोलने 20 धावांमध्ये 2 गडी बाद केले आहेत.
कधी कोणते सामने
भारतीय संघाचा पुढली सामना 19 मार्चला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. हा सामना भारतासाठी महत्वाचा असेल. तर भारतीय संघ 22 मार्चला बांग्लादेश आणि 27 मार्चला गट फेरीतील शेवटचा सामना 22 मार्चला बांग्लादेश आणि 27 मार्चला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तर विश्वचषकातील बाद फेरीचे सामने 30 आणि 31 मार्चला खेळले जाणार आहे. आणि शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलवर खेळला जाणार आहे.
बांगलादेशसाठी सामना कठीण
बांगलादेशचा संघ हा उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडला आहे, असं नाही. त्या संघाचा मार्ग खडतर आहे. बांगलादेशाला त्यांचे बाकी 4 सामने जिंकायचे आहेत. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करणे बांगलादेशसाठी सोपे नसणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. तर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा चौथा संघ बनू शकतो, असंही क्रीडतज्ज्ञांचं मत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत खेळू शकतात.
मितालीची नाराजी
भारताची कर्णधार मिताली राजने आघाडीच्या फळीच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. तर आम्ही 200 पेक्षा जास्त धावा करण्याचा विचार केला होता, पण तसे झाले नाही आणि आम्ही सामना गमावला, असं मिताली यावेळी म्हणाली आहे.
इतर बातम्या