Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC WWC 2022: अरे हे काय, विकेट कसा काढायचा, बॉलचं ग्लोव्हजला चिकटला, वर्ल्डकपमधली घटना, पहा VIDEO

क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा मैदानात अजब-गजब गोष्टी घडतात. ज्यावर विश्वास बसत नाही. एखाद्या षटकात धावा पळून काढताना, चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा रन आऊटच्यावेळी असं काही घडत की, मैदानावरच्या पंचांनाही नेमका काय निर्णय द्यायचा, ते कळत नाही.

ICC WWC 2022: अरे हे काय, विकेट कसा काढायचा, बॉलचं ग्लोव्हजला चिकटला, वर्ल्डकपमधली घटना, पहा VIDEO
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 6:41 PM

मुंबई: क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा मैदानात अजब-गजब गोष्टी घडतात. ज्यावर विश्वास बसत नाही. एखाद्या षटकात धावा पळून काढताना, चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा रन आऊटच्यावेळी असं काही घडत की, मैदानावरच्या पंचांनाही नेमका काय निर्णय द्यायचा, ते कळत नाही. अशीच घटना न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022) घडली. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणभर तुम्हालाही विश्वास बसणार नाही, हे असं कसं घडलं? पण सोमवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) सामन्या दरम्यान अशी घटना घडली. न्यूझीलंडची विकेट किपर कॅटे मार्टिनला (Kate Martin) फिल्डरने केलेला थ्रो वेळेत मिळाला. तिला बांगलादेशची फलंदाज लता मोंडालला रन आऊट करण्याची संधी होती. पण त्यावेळी असं काही घडलं की, तुम्हालाच प्रश्न पडेल. हे कसं होऊ शकतं.

नामी संधी चालून आलेली

बांगलादेशच्या डावात 26 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली. मार्टिनला लताला रनआऊट करण्याची नामी संधी चालून आली होती. न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकाने अचूक थ्रो केला होता. चेंडू वेळेत मार्टिनला मिळाला होता. तिने तिच्याबाजून रनआऊट करण्याचाही प्रयत्न केला. पण चेंडू ग्लोव्हजला चिकटून बसला. त्यामुळे लता धावबाद होण्यासापासून बचावली. पावसामुळे हा सामना 50 ऐवजी 27 षटकांचा खेळवण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

बुक्के मारुन चेंडू पाडावा लागला

चेंडू ग्लोव्हजला असा चिकटून बसला होता की, तो सहज निघतही नव्हता. अखेर मार्टिनने हाताने बुक्के मारले, तेव्हा तो चेंडू ग्लोव्हजमधून खाली पडला. या प्रकाराने मैदानावरील प्रेक्षकांसह कॉमेंटेटर सर्वचजण चक्रावून गेले. आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामन्यातील या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. बांगलादेशने या सामन्यात 27 षटकात आठ विकेट गमावून 140 धावा केल्या. न्यूझीलंडने हे आव्हान आरामात पार केलं. नऊ विकेट आणि 42 चेंडू राखून न्यूझीलंडने हा सामना जिंकला.

ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट.
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका.
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री.
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला.
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद.
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला.
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला.