ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC WWC 2022) आज न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये (New Zealand Women vs Australia Women) सामना झाला. या मॅचमध्ये महिला क्रिकेटपटूंची फर्स्ट क्लास फिल्डिंग पहायला मिळाली.

ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, 'या' महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO
वर्ल्डकप - ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड सामना Image Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 10:40 AM

ऑकलंड: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC WWC 2022) आज न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये (New Zealand Women vs Australia Women) सामना झाला. या मॅचमध्ये महिला क्रिकेटपटूंची फर्स्ट क्लास फिल्डिंग पहायला मिळाली. या सामन्यात तीन महिला क्रिकेटपटूंनी (Women cricketers) फिल्डिंग करताना मैदानावर जी कामगिरी करुन दाखवली, त्याला तोड नाही. मैदानावरील प्रेक्षकांना त्यांनी आपल्या कामगिरीने हैराण करुन सोडलं. यात दोन महिला क्रिकेटपटूंनी अप्रतिम असे झेल घेतले, तर एकीने एकाहाताने कमीलाचा थ्रो करुन रनआऊट केलं. सामन्यातील हे तिन्ही क्षण खूपच रोमांचक होतं. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा या महिला क्रिकेटपटूंच कौतुक कराल. न्यूझीलंडच्या दोन, तर ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटपटूने उत्तम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 45 व्या षटकात मॅडी ग्रीनने सुंदर झेल घेतला, तर मकायने शेवटच्या षटकात एकाहाताने थ्रो करुन सुंदर रनआऊट केला. न्यूझीलंडच्या डावात सहाव्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने अविश्वसनीय झेल घेतला.

असं केलं रनआऊट

फ्रांसिस मकायने ऑस्ट्रेलियाच्या अमांडा जेडला रनआऊट केलं. 50 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अमांडाने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सर्तक असलेल्या मकायने अमांडाने मारलेला फटका रोखला व चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमांडाला एकाहाताने थ्रो करुन धावबाद केलं. तिने फक्त एक रन्स केला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

मॅडी ग्रीनचा जादुई कॅच

न्यूझीलंडची फिल्डर मॅडी ग्रीनने जबरदस्त झेल घेतला. ऑस्ट्रेलियन डावाच्या 45 व्या षटकात हे घडलं. एलिसा पेरी 68 धावांवर खेळत होती. मॅग्राथसोबत मिळून तिने शतकी भागीदारी केली होती. तिने ताहूहुच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळला. पण सीमारेषेरव उभ्या असलेल्या मॅडी ग्रीनने चित्त्याच्या चपळाईने झेपावत सुंदर झेल घेतला. पहाणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिलं.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

कॅचेस विन मॅचेस

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने सुद्धा या सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नाजारा पेश केला. न्यूझीलंडच्या डावात सहाव्या षटकात तिने ही कारामात करुन दाखवली.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

ब्राऊनच्या चेंडूवर मूनीने स्लीपमध्ये एमिलियाचा अदभूत झेल घेतला. या झेलमुळे न्यूझीलंडच्या इनफॉर्म खेळाडूला तंबूत परताव लागलं.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.