WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेत्या न्यूझीलंड संघाला पुरस्काराची भरघोस रक्कम मिळाली आहे, तर भारताचाही खिसा गरम झाला आहे. (ICC WTC Final 2021 India vs New Zealand 1.6 million Dollar Winning Price)
मुंबई : संपूर्ण क्रिकेट विश्वाला ज्या सामन्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलीय… आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) आठ विकेट्स राखून पराभव केलाय. हा सामना म्हणावा असा रोमांचक झाला नाही… एकतर पहिल्यांदा पावसाने दोन दिवसांचा खेळ वाया गेला आणि नंतर भारतीय फलंदाजांकडून चमकदार कामगिरी बघायला मिळाली नाही. न्यूझीलंडने पहिल्या डावात निर्विवाद वर्चस्व राखलं. दुसऱ्या डावांतही किवी गोलंदाजांनी भारताला सळो की पळो करुन सोडलं. भारतीय फलंदाजांना किवी गोलंदाजांनी फार काळ पीचवर जम बसू दिला नाही. परिणामी भारताचा ऐतिहासिक साऊथहॅम्प्टन कसोटीत 8 विकेट्सने पराभव झाला. इतिहासातली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल मॅच न्यूझीलंडने जिंकून दाखवली. विजेत्या न्यूझीलंड संघाला पुरस्काराची भरघोस रक्कम मिळाली आहे, तर भारताचाही खिसा गरम झाला आहे. (ICC WTC Final 2021 India vs New Zealand 1.6 million Dollar Winning Price)
कुणाला किती बक्षिसाची रक्कम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टेस्ट चॅम्पियनशीपच्या विजेत्या आणि उपविजेच्या संघाला पुरस्काराच्या रकमेची अगोदरच घोषणा केली होती. त्यानुसार अंतिम सामना जिंकणाऱ्या विजेच्या संघाला 1.6 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच 11.71 कोटी रुपये दिले जातील तर उपविजेच्या संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 5.85 कोटी रुपये दिले जातील.
उर्वरित संघांनाही पुरस्काराची रक्कम
केवळ विजेत्या आणि उपविजेत्या संघांनाच पुरस्काराची रक्कम मिळालीय असं नाहीय तर उर्वरित संघांनाही पुरस्काराची रक्कम मिळाली आहे. स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 4.50 लाख डॉलर म्हणजेच 3.29 कोटी रुपये मिळणार आहेत. तर चौथ्या स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाला 3.50 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 2.56 कोटी रुपये मिळणार आहेत. बाकी उर्वरित संघांना 1-1 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 73 लाख रुपये मिळणार आहेत.
(ICC WTC Final 2021 India vs New Zealand 1.6 million Dollar Winning Price)
हे ही वाचा :
विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न
WTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव