Explain | BCCI मध्ये दम नाही, 36 वर्षाचा रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन, कसं जिकणार?

Explain | बीसीसीआयने एक आश्चर्यकारक निर्णय घेतलाय. त्यांनी आगामी T20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माला कॅप्टन बनवलय. रोहितला कॅप्टन बनवायच होतं, तर मग 2022 T20 वर्ल्ड कपनंतर त्याला टीममधून ड्रॉप का केलं?. तिलक वर्मा, शिवम दुबे यांच्यासारख्या टॅलेंटेड खेळाडूंच काय? रोहित-विराटमुळे आजही त्यांना टीमच्या बाहेर बसाव लागतय.

Explain | BCCI मध्ये दम नाही, 36 वर्षाचा रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन, कसं जिकणार?
Rohit Sharma Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 8:17 AM

Rohit Sharma | यावर्षी वेस्ट इंडिज-अमेरिकेमध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे. आयपीएल 2024 च्या आयोजनानंतर वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. या वर्ल्ड कपआधी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी T20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच नाव कॅप्टन म्हणून जाहीर केलय. हा खरच आश्चर्यकारक निर्णय आहे. कारण शेवटच्या T20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर T20 संघ बदलणार अशी चर्चा सुरु झाली होती. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये शेवटचा T20 वर्ल्ड कप झाला. त्यात टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला. इंग्लंडने टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. या वर्ल्ड कपनंतर इंग्लिश संघाच्या धर्तीवर टीम इंडियाची बांधणी होणार अशी चर्चा सुरु झालेली. कारण इंग्लंडचे टेस्ट, वनडे आणि T20 साठी वेगवेगळे संघ आहेत. T20 हा क्रिकेटचा वेगवान प्रकार आहे. यामध्ये तुम्ही किती मोठे प्लेयर आहात, हे महत्त्वाच नाहीय. तुमचा फिटनेस जास्त महत्त्वाचा ठरतो.

T20 क्रिकेटमध्ये मॅचची दिशा पलटण्यासाठी एखादी ओव्हर सुद्धा पुरेशी ठरते. अगदी सातव्या-आठव्या नंबरवर येणार फलंदाज सुद्धा वेळेला हिरो ठरतो. मोठे फटके खेळण्यासाठी, वेगात पळण्यासाठी तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे बहुतांश संघात T20 टीममधील खेळाडू तिशीच्या आतमधले असतात. दोन वर्षांपूर्वी T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मंथन झालं. T20 ची टीम नव्याने बांधण्याच्या दिशेने पावल टाकण्यात आली. रोहित शर्माला अधिकृतरित्या T20 टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवलं नाही. पण रोहित आणि विराट कोहली यांच्या नावाचा T20 सीरीजसाठी विचार बंद झाला.

तिलक वर्मा, शिवम दुबे सारख्या टॅलेंटेड खेळाडूंच काय होणार?

T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाने ज्या काही टी 20 मालिका खेळल्या त्यात नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती होती. कारण हार्दिकने आयपीएलमध्ये आपल नेतृत्व कौशल्य सिद्ध केलं होतं. आता अचानक T20 वर्ल्ड कपसाठी कॅप्टन म्हणून पुन्हा रोहित शर्माच्या नावाची घोषणा झालीय. रोहित शर्माच्या वयाचा, फिटनेसचा विचार करता हा निर्णय कितपत योग्य ठरणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाच म्हणजे बीसीसीआय जे बदल करायला निघाली होती, त्यांच काय?. रोहित शर्मा कॅप्टन झाला म्हणजे विराट कोहली सुद्धा वर्ल्ड कपमध्ये खेळणार. मग युवा चेहऱ्याच काय?. तिलक वर्मा, शिवम दुबे यांच्यासारख्या टॅलेंटेड खेळाडूंना रोहित-विराटमुळे आजही टीमच्या बाहेर बसाव लागतय.

तुम्ही वर्ल्ड कप तरी कसा जिंकणार?

बदल करण्यासाठी धमक लागते. ती धमकच बीसीसीआयच्या निर्णयामध्ये दिसत नाही. असंच करायच होतं, मग तुम्ही T20 टीममधून रोहित शर्मा, विराट कोहलीला ड्रॉपच का केलं? भविष्याचा विचार करुन तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकत नसाल, तर तुम्ही वर्ल्ड कप तरी कसा जिंकणार? बीसीसीआयकडे खरच काही प्लान आहे का?

सलग 10 सामने जिंकले म्हणून कॅप्टन बनवायच

रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल बोलायच झाल्यास मैदानावर पळताना त्याची होणारी दमछाक दिसून येते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली. या मध्ये रोहित टीमला चांगली स्टार्ट करुन देत होता. पण तो ती स्टार्ट शतकी खेळीत बदलू शकला नाही. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार सुरुवात करुन दिली होती. पण त्याने अक्षरक्ष: आपला विकेट फेकला. त्याच सामन्यात रोहित थोडा आणखी काहीवेळ मैदानावर उभा राहिला असता तर? तोच 2003 च्या वर्ल्ड कपमधला रिकी पॉन्टिंग आठवा. फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध तो किती अप्रतिम कॅप्टन्स इनिंग खेळला होता. फक्त वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकले, म्हणून टी T20 वर्ल्ड कप टीमच कॅप्टन बनवायच? हे कितपत योग्य आहे. रणनिती आखून बदल करण्याची धमक बीसीसीआयमध्ये नाही, हेच दिसून आलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.