IPL मध्ये चुकला तर वर्ल्डकपमधून बाहेर झालाच समजा हा भारताचा हा युवा धडाकेबाज खेळाडू
टीम इंडियामध्ये अनेक खेळाडू संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे संघात ज्यांना आधीच स्थान मिळालंय त्यांना ते टिकवण्यासाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग ( IPL-2023 ) मध्ये प्रत्येक खेळाडू आपली ताकद दाखवत आहेत. काही बॅटने तर काही बॉलिंगने आपला ठस्सा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ODI World Cup 2023 मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी हीच संधी आहे. परंतु ज्यांची कामगिरी अजूनही सुधारत नाहीये किंवा ज्यांना अजून चांगला धावा किंवा विकेट घेता आलेल्या नाही त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण टीममध्ये नंतर बदल देखील केले जावू शकतात.त्यामुळे ज्यांना संधी मिळाली आहे त्यांना उत्तम कामगिरी तर करायचीच आहे पण ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्याकडे देखील दमदार कामगिरी करुन संघात स्थान मिळवण्यासाठी दारं उघडी आहेत.
IPL मध्ये चांगली कामगिरीची संधी
शुभमन गिल सध्या IPL 2023 मध्ये चांगली का्मगिरी करतोय. शनिवारी लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध खाते न उघडता गिल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला कृणाल पांड्याने रवी बिश्नोईच्या हाती झेलबाद केले. गिलने या मोसमात 6 सामन्यात एकूण 228 धावा केल्या आहेत, परंतु त्याची बॅट चालली नाही तर आगामी विश्वचषकातून त्याचं स्थान धोक्यात येऊ शकतं.
कोण घेणार जागा?
शुभमन गिल ( Shubhaman Gill ) याचं स्थान जर धोक्यात आलं तर त्याची जागा कोण घेणा हा प्रश्नही अनेकांच्या मनात आला असेल. तर याचं उत्तर अवघड असण्याचं कारण नाही. कारण संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. ज्यामध्ये पहिलं नाव येतं ते शिखऱ धवन ( Shikhar Dhawan ) याचं. तो विश्वचषकात गिलची जागा घेऊ शकतो. गिल जर संघातून बाहेर झाला तर धवनला बॅकअप म्हणून संघात ठेवले जाऊ शकते आणि त्यानंतर त्याला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते.
आतापर्यंतची कामगिरी
23 वर्षीय शुभमन गिलने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 24 एकदिवसीय सामने खेळले असून 1311 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने 15 कसोटी सामन्यात 2 शतके आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 890 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका शतकाच्या मदतीने 202 धावा केल्या आहेत.