Rajvardhan Hangargekar: दोषी ठरला, तर राजवर्धन हंगरगेकरच IPL कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार?
राजवर्धनवर वय लपवल्याचा आरोप आहे. खेळ आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजवर्धन हंगरगेकरवर (Rajvardhan Hangargekar) वय लपवल्याचा आरोप केला आहे.
मुंबई: उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरवर (Rajvardhan Hangargekar) मोठा आरोप झाला आहे. राजवर्धनवर वय लपवल्याचा आरोप आहे. खेळ आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजवर्धन हंगरगेकरवर वय लपवल्याचा आरोप केला आहे. ओमप्रकाश बकोरिया या IAS अधिकाऱ्याने BCCI ला एक पत्र पाठवलं आहे. त्यात राजवर्धन हंगरगेकर विरोधात पुरावे दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजवर्धन हंगरगेकरच खरं वय 21 वर्ष आहे. पण वय लपवून तो अंडर 19 (Rajvardhan Hangargekar Age Controversy) वर्ल्डकपमध्ये खेळला. संघाच्या विजयात राजवर्धनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टीम इंडियाने इंग्लंडला नमवून वर्ल्डकप जिंकला होता. 2017-18 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील सलामीवीर मनजोत कालरा सुद्धा वयाच्या वादामध्ये अडकला होता. त्याच्यावर एक वर्ष बंदी घालण्यात आली होती.
चौकशीत दोषी आढळला तर पुढे काय?
बीसीसीआयच्या चौकशीत हंगरगेकर दोषी आढळला तर त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. असं झालं तर हंगरगेकरसाठी तो मोठा झटका असेल.
IPL कॉन्ट्रॅक्टचं काय होणार?
IPL-2022 च्या महा लिलावात राजवर्धनची बेस प्राईस 30 लाख रुपये इतकी होती. महेद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने 1.50 कोटी रुपयांची बोली लावत या खेळाडूचा आपल्या ताफ्यात समावेश केला. मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूसाठी बोली लावली होती, पण चेन्नई आणि लखनौ सुपरजायंट्सने या खेळाडूवर अधिक विश्वास दाखवला. या दोन चेन्नई आणि लखनौमधलं बिडींग वॉर 1.50 कोटी रुपयांपर्यंत गेलं. अखेर चेन्नईने बाजी मारली. वय लपवल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजवर्धनचं IPL कॉन्ट्रॅक्टही रद्द होऊ शकतं.
वयाचा नेमका झोल काय?
राजवर्धन धाराशिवच्या टेरना पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या रेकॉर्डनुसार, पहिली ते सातवीपर्यंत हंगरगेकरची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. पण आठवीमध्ये नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनधिकृतपणे राजवर्धनची जन्मतारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 केली. 14 जानेवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत राजवर्धन हंगरगेकरचं वय 21 वर्ष होतं.
If Rajvardhan Hangargekar found guilty in Age Controversy will his ipl contract cancel