IND vs ENG : ‘वर टाकला तर देतो..’, लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्माचं वाक्य स्टंप माईकने पकडलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्माची बॅट पुन्हा एकदा तळपली. विराट कोहली आणि ऋषभ पंत झाल्यानंतरही रोहितच्या फलंदाजीची धार काही कमी झाली नाही. राशीदच्या गोलंदाजीवर त्याने सूर्याला सांगितलं आणि पुढच्या चेंडूवर करून दाखवलं.

IND vs ENG : 'वर टाकला तर देतो..', लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्माचं वाक्य स्टंप माईकने पकडलं
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 11:48 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. विराट कोहली झटपट बाद झाल्यानंतर फलंदाजीत कोणतीच कसर सोडली नाही. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊन काही काळ खेळ थांबला. मैदानात उतरल्यानंतर रोहितने तोच आक्रमक अंदाज दाखवला. रोहित शर्माने 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाची धावगती वाढण्यास मदत झाली. आदिल राशीदच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि त्रिफळा उडाला. पण तत्पूर्वी लियाम लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर षटकार मारण्यापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. संघाचं 11वं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी लियाम लिविंगस्टोन आला होता. तेव्हा पहिल्या चार चेंडूंना सूर्यकुमार यादव सामोरं गेला. शेवटचे दोन चेंडू कर्णधार रोहित शर्माच्या वाटेला आले.

रोहित शर्माला टाकलेला पाचवा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर धावगती राखण्यासाठी रोहितने नॉन स्ट्राईक एण्डला असलेल्या सूर्यकुमार यादवला सांगितलं की, चेंडू वर टाकला तर मारणार. झालंही तसंच काहीसं..लियाम लिविंगस्टोन चेंडू वर टाकला आणि रोहित शर्माने उत्तुंग षटकार मारला. हा षटकार मारताच रोहित शर्मा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. दुसरीकडे, रोहित शर्मा 5000 धावा करणारा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.

Non Stop LIVE Update
आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे 'हे' प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स
आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे 'हे' प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स.
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले...
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा.
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.