उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

सध्या इंडियन प्रिमीयर लीग सुरु असून त्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र टी20 क्रिकेटची हवा असल्याचं दिसून येत आहे.

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर 'या' खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 7:43 PM

लंडन: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ अप्रतिम कामिगिरी करत असून संघाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) उत्तम फॉर्ममध्ये आहे. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने जाडेजावर स्तुतीसुमनं उधळत त्याला उत्कृष्ट टी20 क्रिकेटरची पदवीच जणू दिली आहे.  वॉनच्या मते जाडेजा क्रिकेटमध्ये सर्व गोष्टींत तरबेज आहे. त्यामुळे कोणत्याही युवा खेळाडूला ताकदवर फटकेबाजी करायची असल्यास तो ख्रिस गेलला फॉलो करेल. तर परफेक्टनेससाठी विराटला पण जर या दोन्हीचं एकत्र मिश्रण हवं असल्याच जाडेजा परफेक्ट आहे असं वॉन म्हणाला आहे.

माइकल वॉनने क्रिकबजवर दिलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट केली. त्याने लिहिलं होत, “जाडेजा एक कमाल फलंदाज आहे. क्रिकेटपटूमध्ये हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला एक उत्तम टी-20 क्रिकेटर बनयचं आहे. तर रवींद्र जाडेजासा आयडल समजून खेळा. कारण तो एक संपूर्ण पॅकेज आहे.”

बेस्ट टी20 क्रिकेटर आहे जाडेजा

माइकल वॉनने जाडेजाच्या क्षेत्ररक्षणाचंही कौतुक केलं. तसच तो एक शानदार डावखुरा स्पिनर असून संघाचे लवकर विकेट गेल्यास जाडेजा एकहाती खेळ चालवू शकतो. असंही वॉन म्हणाला. तो महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या विकेट्स घेत असून त्यामुळे त्याला एक आइडियल टी20 क्रिकेटरची पदवी वॉनने दिली.

यंदाचं पर्व जाडेजासाठी भारी

रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना यंदाच्या पर्वात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 13 सामन्यात 212 रन केले आहेत. सोबतच त्याने 10 विकेट्सही पटकावल्या आहेत. जाडेजा आय़पीएलमधील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये मोडतो. त्याने आतापर्यंच 197 आयपीएलच्या सामन्यात 2 हजार 371 धावा करत 124 विकेट्स घेतल्या आहेत.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान

PHOTO: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा रॉयल लूक, पारंपरिक वेशभूषेत खास फोटोशूट

(If you want to be best t20 cricketer follow ravindra jadeja says michael vaughan)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....