Virat Kohli सारखच ‘या’ पाकिस्तानी बॅट्समनने हॅरीस रौफल धुतलं, मॅच फिरवली VIDEO

या शतकामध्ये सर्वात मोठ आकर्षण होतं, पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफची धुलाई. 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर इफ्तिखारने 3 सिक्स मारले. रौफच्या धुलाईने कोहलीची आठवण झाली.

Virat Kohli सारखच 'या' पाकिस्तानी बॅट्समनने हॅरीस रौफल धुतलं, मॅच फिरवली VIDEO
virat kohli Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 9:30 AM

ढाका: पाकिस्तान क्रिकेट टीमची सध्या कुठलीही सीरीज सुरु नाहीय. पण काही खेळाडू बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये आपला जलवा दाखवतायत. मोहम्मद रिजवान, हॅरिस रौफ हे पाकिस्तानी टीमचे नियमित सदस्य या टुर्नामेंटचे आकर्षण आहेत. या दोघांच्या उपस्थितीत इफ्तिखार अहमदने आपल्या खेळाने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. त्याने धुवाधार बॅटिंग करुन शतक ठोकलं. इफ्तिखारने फक्त सेंच्युरीच मारली नाही, तर पाकिस्तानी टीममधील सहकारी हॅरिस रौफची बॉलिंग फोडून काढली.

पाकिस्तानी टी 20 टीमचा भाग

हे सुद्धा वाचा

चट्टोग्राममध्ये गुरुवारी 19 जानेवारीला फॉर्च्यून बरिशल आणि रंगपुर रायडर्समध्ये सामना झाला. बरिशलने पहिली बॅटिंग केली. त्याच्यासाठी कॅप्टन आणि बांग्लादेशी सुपरस्टार शाकीब अल हसनने 43 चेंडूत नाबाद 89 धावा फटकावल्या. त्याने स्थानिक प्रेक्षकांना आपल्या खेळाने खूश केलं. पण या मॅचमध्ये पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने सर्वात जबरदस्त खेळ केला. तो पाकिस्तानी टी 20 टीमचा भाग आहे.

45 चेंडूत शतक

46 रन्सवर 4 विकेट गेले होते. त्यावेळी इफ्तिखार क्रीजवर आला. शाकीबसोबत मिळून त्याने नाबाद 192 धावांची पार्ट्नरशिप केली. टीमची धावसंख्या 238 पर्यंत पोहोचवली. या पार्ट्नरशिप दरम्यान इफ्तिखारने रंगपुर रायडर्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या पाकिस्तानी बॅट्समनने लास्ट ओव्हरमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. त्याने 45 चेंडूत शतक झळकावलं. इफ्तिखारच्या टी 20 करिअरच हे पहिलं शतक आहे.

इफ्तिखारने आपल्या इनिंगमध्ये फक्त 78 रन्स चौकार-षटकारांनी वसूल केले. त्याने एकूण 9 सिक्स आणि 6 फोर मारले.

रौफच्या धुलाईने कोहलीची आठवण

या शतकामध्ये सर्वात मोठ आकर्षण होतं, पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफची धुलाई. 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर इफ्तिखारने 3 सिक्स मारले. जवळपासन तीन महिन्यापूर्वी विराट कोहलीने सुद्धा 19 व्या ओव्हरमध्ये हॅरिसला सलग 2 सिक्स मारुन मॅच फिरवली होती. हॅरिसने 42 रन्स देऊन 2 विकेट काढले. किती धावांनी विजय मिळवला?

238 धावांची मोठी धावसंख्या उभारल्यानंतर बरिशलने बऱ्याच प्रमाणात आपला विजय निश्चित केला होता. त्यानंतर गोलंदाजांवर जबाबदारी होती. शाकीबच्या टीमने हे काम योग्यपणे केलं. मेहदी हसन मिराजने 3 विकेट काढले. त्यांनी रंगपुर रायडर्सला 171 धावांवर रोखून 67 धावांनी विजय मिळवला.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.