Abu Dhabi T10 League: हरभजनच्या बॉलिंगवर पाकिस्तानी बॅट्समनचा हल्लाबोल, 30 चेंडूत कुटल्या 83 धावा, 8 SIX, VIDEO
Abu Dhabi T10 League: पाकिस्तानी फलंदाज दिल्ली बुल्सच्या टीमवर भारी पडला.....
दुबई: Abu Dhabi T10 League मध्ये रोज एकापेक्षा एक सामने पहायला मिळतायत. या लीगमध्ये 19 व्या सामन्यात बांग्ला टायगर्स आणि दिल्ली बुल्सची टीम आमने-सामने होती. यात भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये सामना पहायला मिळाला. हरभजन सिंह आणि पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद या दोन प्लेयर्समध्ये सामना पहायला मिळाला. ते अबू धाबीमध्ये परस्पराविरोधात खेळत होते. हरभजन दिल्ली बुल्ससाठी खेळत होता. इफ्तिखार बांग्ला टायगर्सच प्रतिनिधीत्व करत होता. या मॅचमध्ये इफ्तिखारने आपल्या टीमला शानदार विजय मिळवून दिला.
इफ्तिखार अहमदने धुतलं
इफ्तिखार अहमदने 30 चेंडूत नाबाद 83 धावा फटाकवल्या. यात 8 सिक्स आणि 5 चौकार आहेत. इफ्तिखारचा स्ट्राइक रेट 276 चा होता. त्याच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर बांग्ला टायगर्सने 133 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दिल्ली बुल्सच्या टीमने 121 धावा केल्या. दिल्लीसाठी टिम डेविडने 6 षटकार मारले. त्याने 20 चेंडूत 50 धावा चोपल्या. पण त्याने फार फरक पडला नाही.
हरभजन-इफ्तिखारची टक्कर
या मॅचमध्ये हरभजन आणि इफ्तिखार अहमदची टक्कर हा सुंदर क्षण होता. हरभजनच्या 5 व्या ओव्हरमध्ये इफ्तिखार समोर होता. दोन चेंडूत इफ्तिखारने एक सिक्स आणि एक चौकार लगावला. हरभजनने दुसऱ्या गोलंदाजांच्या तुलनेत चांगलं प्रदर्शन केलं. हरभजनने 2 ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.
इफ्तिखार अहमदची कमाल
इफ्तिखार अहमदने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक फटकावलं. पाकिस्तानी फलंदाज चौथ्या ओव्हरमध्ये क्रीजवर आला. पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकले. हरभजनच्या गोलंदाजीवर त्याने एक आणि रिचर्ड ग्लीसनच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारले. ग्लीसनच्याच पुढच्या ओव्हरमध्ये त्याने 3 सिक्स आणि 2 चौकार लगावले. बांग्ला टायगर्सने त्या ओव्हरमध्ये 26 धावा लुटल्या.
The battle between Iftikhar Ahmed and Harbhajan Singh ?????#AbuDhabiT10 pic.twitter.com/pg8Nr7uBvp
— Farid Khan (@_FaridKhan) November 29, 2022
वर्ल्ड कपमध्ये अपयशी
इफ्तिखार अहमदने आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये फार चांगली कामगिरी केली नव्हती. इफ्तिखारचा स्ट्राइक रेट खराब होता. त्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 22.80 च्या सरासरीने 114 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 122 चा होता.