Video | खरच तो सिकंदर, अपेक्षा नव्हती ते शेवटच्या चेंडूवर दाखवलं करुन

फक्त 32 धावात 3 विकेट गमावल्या होत्या. अशावेळी दोघांनी इनिंग संभाळली. दोघांनी टीमला 100 च्या पार नेलं. त्यानंतर सिकंदर त्याच्या नावासारखाच खेळला. सगळ्या टीमचा भार त्याने आपल्या खांद्यावर घेतला.

Video | खरच तो सिकंदर, अपेक्षा नव्हती ते शेवटच्या चेंडूवर दाखवलं करुन
sikandar razaImage Credit source: Twitter/ILT20
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 9:10 AM

नवी दिल्ली : विजय कसाही मिळो, त्यापासूनच आनंदच मिळतो. दमदार प्रदर्शन आणि एकतर्फी विजयामुळे कुठलाही खेळाडू आणि टीमचा आत्मविश्वास वाढतो. अशा विजयामधून दबदबा दिसून येतो. अनेकदा कठिण परिस्थितीतून मिळालेल्या विजयामुळे आनंद मिळतो. त्यातून आत्मविश्वास अधिक मजबूत होतो. क्रिकेटच्या मैदानात शेवटच्या चेंडूवर मिळालेला विजय दीर्घकाळ लक्षात राहतो. शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन विजय मिळाला, तर तो आनंदच वेगळा असतो. आज सिकंदर रजाच्या भावना सुद्धा अशाच असतील.

सिकंदर रजा अडचणीत असलेल्या आपल्या टीमला स्वबळावर बाहेर काढतो. मागच्या काही काळात त्याने अशी स्वत:ची ओळख बनवली आहे. त्याने अनेकदा झिम्बाब्वेसाठी कमाल केली आहे. आयपीएलसह जगभरातील T20 लीगमध्ये त्याने अशीच कमाल दाखवली आहे. यूएईमधील IL T20 लीगमध्ये त्याने अशीच आश्चर्यकारक कामगिरी केली. सिकंदरने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारला.

मग सिकंदरने सर्व जबाबदारी संभाळली

डेजर्ट वायपर्स आणि दुबई कॅपिटल्समध्ये शुक्रवारी 9 फेब्रुवारीच्या संध्याकाळी दुबईत सामना झाला. वायपर्सने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 171 धावा केल्या. त्यानंतर कॅपिटल्सने फक्त 32 धावात 3 विकेट गमावल्या. अशावेळी सिकंदर रजा आणि कॅप्टन सॅम बिलिंग्सने इनिंग संभाळली. दोघांनी टीमला 100 च्या पार नलें. त्यानंतर बिलिंग्स आऊट झाला. मग सिकंदरने सर्व जबाबदारी संभाळली.

अपेक्षा नव्हती, ते करुन दाखवलं

शेवटच्या ओव्हरमध्ये दुबई कॅपिटल्सला विजयासाठी 13 धावांची गरज होती. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार मारला. पुढच्या 4 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. स्ट्राइकवर सिकंदर रजा होता. समोर अली नसीर गोलंदाजी करत होता. त्याला अजिबात अपेक्षा नसेल, सिकंदर रजा असा स्ट्रोक खेळला. सिकंदरने लॉन्ग ऑफ बाऊंड्रीच्या बाहेर सिक्स मारुन 5 विकेटने टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला. सिकंदरने 45 चेंडूत 60 धावा केल्या.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.