T20 वर्ल्डकपमधून काढल्यानंतर या भारतीय गोलंदाजाची कामगिरी सुधारली, आता म्हणतो, जुना युजी परतला!

Yuzvendra Chahal: जेव्हा तुम्हाला माहित असतं की तुमचं रॅंकिंग चांगलं आहे, तेव्हा मनोबल उंचावतं. बऱ्याच काळानंतर चांगली गोलंदाजी केल्याचा मला आनंद आहे. मी एवढंच म्हणू शकतो की जुना युजी परत आला आहे.

T20 वर्ल्डकपमधून काढल्यानंतर या भारतीय गोलंदाजाची कामगिरी सुधारली, आता म्हणतो, जुना युजी परतला!
Yuzvendra Chahal
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 2:29 PM

भारताच्या टी -20 विश्वचषकात (T20 World Cup) स्थान मिळवू न शकलेला लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गुरुवारी म्हणाला की, यावर्षी IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात तो आधीसारखाच स्मार्ट आणि विकेट टेकर गोलंदाज असेल. रॉयल चॅलेंजर्सने बंगळुरुसोबत सराव झाला. या सत्रात चहलने ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूंचाही सामना केला. संघासोबतच्या पहिल्या सराव सत्राबद्दल तो म्हणाला, “बरं वाटतं. मी माझ्या बोलिंगवर खूश आहे. जेव्हा तुम्हाला माहित असतं की तुमचं रॅंकिंग चांगलं आहे, तेव्हा मनोबल उंचावतं. बऱ्याच काळानंतर चांगली गोलंदाजी केल्याचा मला आनंद आहे. मी एवढंच म्हणू शकतो की जुना युजी परत आला आहे. ( Improvement of Yajuvendra Chahal’s performance after being removed from T20 World Cup. Now says, UG is back)

कोरोना महामारीमुळे मे महिन्याच्या मध्यात थांबलेलं IPL 2021 रविवारपासून UAEमध्ये सुरू होणार आहे. चहल त्या खेळाडूंपैकी एक असेल जे भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील IPL 2021 च्या पहिल्या सत्रात अपयशातून सावरण्याचा चहलने प्रयत्न केला.7 सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या. आधीच्या 7 सामन्यांत त्याचा इकोनॉमी रेट 8.26 इतका होता, जो निराशाजनक आहे. मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यावर म्हणाले की, ‘जेव्हा खेळाडू सराव करायला येतो तेव्हा त्याला त्यांची भूमिका माहित असते. आम्ही बैठकीत याबद्दल चर्चा केली आहे, जेणेकरून नेट प्रॅक्ट्रीसमध्ये कुणाला काय सुधारायचं आहे, हे त्याला ठावूक आहे. RCB सध्या 7 पैकी 5 सामन्यांतील विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.

20 सप्टेंबरला RCBचा सत्रातील पहिला सामना

ट्रेनिंग सेशनमध्ये एबी डिव्हिलिअर्स आणि ग्लेन मॅक्सवेलने चहलचं स्वागत केलं. नेट सेशननंतर डिव्हिलिअर्स आणि मॅक्सवेलने एक खेळ खेळला. ज्यात लाबून टेनिस बॉल आणि रॅकेटच्या मदतीने स्टंप उडवायचे होते. हा गेम खूप लहान असताना खेळायचो, असं एबीडी यावेळी म्हणाला. सध्या कॅप्टन विराट कोहली क्वारंटीन आहे आणि ट्रेनिंगला तो येत नाही. 2-3 दिवसांत विराट कोहलीचा क्वारंटीन पिरिएड संपणार आहे. त्यानंतर तो मैदानात दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर बँगलोरचा दुसऱ्या सत्रातील पहिला सामना 20 सप्टेंबरला होणार आहे.

संबंधित बातम्या:

राजस्थान रॉयल्सला मिळाला 38 सिक्सर ठोकणारा धुरंधर, IPL 2021 मध्ये आता तुफान येणार!

शार्दुल ठाकूरची बँटिंग इतकी कशी सुधारली, टीम इंडियातील दोन शिलेदारांची मदत, वाचा इनसाईड स्टोरी

 

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.