T20 World Cup 2021: बांग्लादेश-श्रीलंका सामन्यात जबरदस्त बाचाबाची, गोलंदाज अंगावर जाताच बांग्लादेशच्या फलंदाजानेही उचलली बॅट, पाहा Video

सायंकाळचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी सध्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामना सुरु असून बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या आहेत.

T20 World Cup 2021: बांग्लादेश-श्रीलंका सामन्यात जबरदस्त बाचाबाची, गोलंदाज अंगावर जाताच बांग्लादेशच्या फलंदाजानेही उचलली बॅट, पाहा Video
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 5:20 PM

T20 World Cup 2021: सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाचे खेळाडू जीवचं रान करत असतात. त्यात विश्वचषकासारखे सामने असले तर मैदानात जोश भरपूर असतो. पण काहीवेळा याच जोशात काही खेळाडू वेगळ्याच रंगात असतात. रागाच्या रंगात असणाऱ्या या खेळाडूंमुळे मैदानावर वाद होत असतो. अशीच काही घटना बांग्लादेश आणि श्रीलंका सामन्यामध्ये घडली. बांग्लादेशची फलंदाजी सुरु असताना पहिलाच विकेट पडला असता श्रीलंकेचा गोलंदाज आक्रमकता दाखवत थेट फलंदाजाच्या अंगावर गेला.

शारजाहमध्ये सुरु असलेल्या बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. यावेळी सलामीवीर लिटन दास आणि नईम यांनी अप्रतिम सुरुवात केली. पण लिटन याची विकेट जाताच मैदानात असं काही घडलं की मैदानात अगदी वातावरणचं बदलंल. लिटन दासची विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा अगदी जोशामध्ये लिटनच्या अंगावर गेला. त्याचा आक्रमक अंदाज पाहून सर्वच खेळाडू सोडवा सोडवी करायला आले. नॉन स्ट्राईकर नईमही यावेळी मध्ये पडला. तर लिटननेही जाता जाता बॅट समोर आणत कुमाराला खुन्नस दिली.

श्रीलंकेसमोर 172 धावांचे आव्हान

बांग्लादेशच्या संघाने उत्तम फलंदाजी करत एक चांगलं आव्हान श्रीलंका संघासमोर ठेवलं आहे. यावेळी सलामीवीर नईमने 62 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. तर मुशफिकूर रहिमने 57 धावा करत टी20 विश्वचषकातील पहिलं अर्धशतक ठोकलं आहे. त्याशिवाय लिटन दासने 16, शाकिबने आणि महमदुल्लाहने प्रत्येकी 10 धावा केल्या.

बांग्लादेशचा संघ – मोहम्मद नईम, लिटन दास, शाकिब अल हसन, मुश्फिकर रहीम, महमूदुल्लाह, अफीफ हुसैन, नुरूल हसन, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, नसुम अहमद, मुस्तिफिजुर रहमान.

श्रीलंकाचा संघ- कुसल परेरा, पाथुम निसांका, चरिथ असालंका, अविष्का फर्नाण्डो, भानुका राजपक्षा, दासुन शनाका, वानेंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नाण्डो, लाहिरु कुमारा.

इतर बातम्या

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

T20 World Cup 2021: विराट कोहलीकडे ICC चॅम्पियन बनण्याची शेवटची संधी, IPL मधली चूक टाळणं गरजेचं

(In Bangaldesh vs Sri lanka match L kumara and liton das fight video went viral)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.