CPL 2021 : हवेमध्ये उडत पकडला झेल, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पाहावा असा VIDEO
कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये दररोज काहीतरी रोमहर्षक घडत आहे. कधी पोलार्डचा पंचाशी वाद, तर कधी ब्राव्हो आणि हीटमायरमधील मजेशीर क्षण. नुकत्याच झालेल्या सामन्यातही एका खेळाडूने पकडलेल्या कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई : इंडियन प्रिमीयर लीगपूर्वी (IPL 2021) सध्या क्रिकेट रसिक कॅरेबियन प्रीमियर लीगचा (CPL) आनंद लुटत आहेत. भारतीय खेळाडू नसले तरी इतर देशांचे धाकड खेळाडू या लीगमध्ये खेळत असल्याने या सामन्यांमध्ये बरेच रोमहर्षक क्षण घडत असतात. उत्कृष्ट क्रिकेटसह काही अशाही घटना घडतात, ज्यामुळे प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन होत आहे. अशाच एका प्रसंगाचे प्रेक्षक त्रिनिबागो नाइट रायडर्स (Trinibago Knight Riders) विरुद्ध गयाना एमेजॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) सामन्यादरम्यान साक्षीदार झाले.
रायडर्सचा खेळाडू अकील हुसैन (Akeal Hossain) एक अप्रतिम झेल घेत सर्वांचीच मनं जिंकली. वारियर्सचा संघ नाइट रायडर्सच्या 139 धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी 18 व्या ओव्हरमध्ये रवि रामपालने वॉरियर्सचा कर्णधार निकोलस पूरनला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. पूरनने उत्कृष्ट फटका खेचत षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या हुसैनने अगदी सुपरहिरोप्रमाणे हवेत उडी घेतल झेल पकडला. इतकच नाही त्याने झेल पकडताच त्याचा तोल सीमारेषेवर गेला असता पण त्याने अप्रतिमपणे तोल सावरत षटकार जाण्यापासून तर रोखलाच आणि पूरनला बादही केले.
AMAZING!!! What a catch by Akeal Hosein our @fun88eng magic moment from match11. #CPL21 #TKRvGAW #CricketPlayedLouder #FUN88 pic.twitter.com/f2khmxAssy
— CPL T20 (@CPL) September 1, 2021
सामना मात्र निसटला
दोन्ही संघाच्या अप्रतिम खेळामुले सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामना अगदी सुपर ओव्हरपर्यंत गेला. सर्वात आधी नाइट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 138 रन केले. ज्यानंतर वॉरीयर्स संघानेही हा स्कोर केला. ज्यामुळे विजेता निवडण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली गेली. ज्यात गयाना एमेजॉन वॉरियर्सचा संघ विजयी झाला.
हे ही वाचा
भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा
CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO
(In CPL akeal hosein takes brilliant catch for trinbago knight riders against guyana amazon worriors)