Cricket Facts : क्रिकेट इतिहासात जेव्हा पहिल्यांदाच एका संघातून दोघी बहिणी खेळल्या होत्या, ‘ही’ आहेत नावं

क्रिकेट जगतात अनेक सख्या भावांनी मिळून मैदान गाजवल्याच आपण जाणतो. भारतासह सर्वच देशांकडे अशी अनेक उदाहरण आहेत. पण दोघी सख्या बहिणी एकाच कसोटी सामन्यात देशाकडून खेळल्याचं तुम्हाला माहित आहे का?

Cricket Facts : क्रिकेट इतिहासात जेव्हा पहिल्यांदाच एका संघातून दोघी बहिणी खेळल्या होत्या, 'ही' आहेत नावं
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 1:05 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये एकाच संघातून दोन सख्खे भाऊ खेळत असल्याची अनेक उदाहरण आपण जाणतो. त्यासाठी दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव व्हॉ-मार्क व्हॉ यांच्यापासून सध्या इंग्लंडकडून खेळणारे सॅम करन-टॉम करन हे अष्टपैलू बंधुबाबत आपल्याला माहित आहे. भारताचा विचार करता आधी युसुफ पठाण-इरफान पठाण आणि आता हार्दीक पांड्या-कृणाल पांड्या मैदान गाजवत आहेत. पण या सर्वांमध्ये दोघी सख्या बहिणी देखील एकाच सामन्यात खेळल्या होत्या याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर ऐका.. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी एकाच संघाकडून एका वेळीच सामना खेळणाऱ्या बहिणी म्हणजे न्यूझीलंड संघाच्या ‘सिग्नल सिस्टर्स’. (In Cricket History First Twin Sisters to Play in the Same test New Zealands Signal Sisters Played together on this Day)

रोजमेरी सिग्‍नल आणि एलिजाबेथ सिग्‍नल अशी या दोघी बहिणींची नावे असून आजच्याच दिवशी म्हणजे 6 जुलै, 1984 साली त्यांनी न्यूझीलंड संघाक़डून एका टेस्टमध्ये एकत्र खेळी केली होती. सख्या बहिणी एकत्र एका संघाकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आजही इतिहासात या दोन्ही बहिणींना आठवले जाते.

रोजमेरी 1  टेस्‍ट आणि 6 वनडेच खेळू शकली

रोजमेरी सिग्‍नलने न्‍यूझीलंड संघाकडून केवळ एकच कसोटी सामना खेळला. ज्यात तिन्हे दोन्ही डावांत मिळून 8 च्या सरासरीन 8 धावा केल्या. संपूर्ण सामन्यात ती एकही विकेट घेऊ शकली नाही. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता रोजमेरी 6 वनडे खेळली. ज्यात 6 च्या सरासरीने तिने 12 धावा केल्या. 8 हा तिचा सर्वोच्च स्कोर राहिला. वनडे क्रिकेटमध्ये तिच्या नावावर दोन विकेट्स आहेत.

एलिजाबेथ खेळली 6 टेस्‍ट आणि 19 वनडे

रोजमेरीची बहिण एलिजाबेथ सिग्‍नलने न्‍यूझीलंडकडून 6 कसोटी सामने खेळले. ज्यात 20.50 च्या सरासरीने तिने 6 डावांत 82 धावा केल्या. नाबाद 55 हा तिचा सर्वोच्च स्कोर होता. सोबतच तिने कसोटी कारकिर्दीत आठ विकेट्सही पटकावले.  एलिजाबेथने 19 वनडेमध्ये 11.28 च्या सरासरीने 12 डावांत 79 धावा केल्या. नाबाद 28  हा तिचा सर्वोच्च स्कोर होता. 19 वनडेमध्ये तिने 7 विकेट्स घेतले.

हे ही वाचा –

कधी अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या खेळाडूने ठोकलं दुहेरी शतक, भारतीय संघावर मिळवला दमदार विजय

भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई

Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो

(In Cricket History First Twin Sisters to Play in the Same test New Zealands Signal Sisters Played together on this Day)

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.