भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघावर कोरोनाने हल्ले केला आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनंतर आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
लंडन : इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघावर कोरोनाव्हायरसने हल्लाबोल केला आहे. आधी संघातील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोनाबाधित आढळला असून त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर आहे. संबधित सदस्याला आयसोलेट करण्यात आले असून तो संघासोबत डरहमला जाणार नाही. दरम्यान आणखी 3 कोचिंग असिस्टंटनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतसह आणखी चार सदस्य इतर संघासोबत डरहमला जाऊ शकणार नाही. यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंच आहेत. या चौघांची नावं अजून समोर आलेली नसून हे तिघेही इतर संघातील खेळाडूप्रमाणेच WTC Final नंतर मागील 20 दिवसांपासून इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत.
पंतला डेल्टा वेरियंटची बाधा
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत मागील 8 दिवसांपासून विलगीकरणात असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. मात्र तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून तो आणखी काळ विश्रांती करणार असून भारतीय संघ डरहमला खेळायला जाणाऱ्या सराव सामन्यासाठीही पंत संघासोबत नसणार आहे. पंतची प्रकृती ठिक होण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून युकेमध्ये आढळणारा डेल्टा वेरियंटच पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.
पंतला युरो चषकाचा सामना पडला महाग
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यामनी युकेमधील कोरोना परिस्थितीमुळे खेळाडूंना इमेलद्वारे काही सूचना दिल्या होत्या. ज्यात त्यांनी खेळाडू आणि टीमच्या इतर सदस्यांना युरो चषक 2020 विम्बल्डनसारख्या भव्य स्पर्धांना हजेरी न लावण्याबाबत सतर्क केले होते. मात्र इतर खेळाडूंप्रमाणेच पंतने देखील इंग्लंड विरुद्ध जर्मनी या सामन्याला लंडनच्या वेम्बली मैदानात हजेरी लावली होती. त्यामुळे त्याचठिकाणी त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Good experience watching ⚽️. ??????? vs ?? pic.twitter.com/LvOYex5svE
— Rishabh Pant (@RishabhPant17) June 30, 2021
हे ही वाचा :
ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?
मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?
भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!
(In England After Rishabh Pant one more Indian Staff member tested Corona Postive)