IND vs ENG | पराभवानंतर टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी, दुसऱ्या टेस्टमध्येही होणार मोठ नुकसान
IND vs ENG 1st Test | हैदराबाद टेस्ट मॅचमध्ये चौथ्या दिवशी टीम इंडियाचा पराभव झाला. त्याआधी टीम इंडियाला एक वाईट बातमी मिळालीय. त्याचा परिणाम दुसऱ्या कसोटी सामन्यावर दिसून येईल. टीम इंडियाचा हा पराभव चाहत्यांसाठी मोठा झटका आहे. कारण असं काही होईल, याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
IND vs ENG 1st Test | हैदराबादमध्ये रविवारी 28 जानेवारीला संध्याकाळी एक नको असलेल दृश्य पहायला मिळालं. टीम इंडियाच्या चाहत्यांनी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना झाला. या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या दोन दिवसाच्या खेळावर टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. पण, अखेरीस 28 धावांनी सामना गमावला. टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडली आहे. या पराभवासोबतच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ज्याच्या परिणाम पुढच्या कसोटी सामन्यात दिसून येईल.
रविवारी सीरीजमधल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला. भारतीय टीमला विजयासाठी 231 धावांची गरज होती. पण कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन सेशनच्या आत भारताच्या 10 विकेट पडल्या. टीम इंडियाला फक्त 202 धावा करता आल्या. टीम इंडियाचे विकेट जात असतानाच एक घटना घडली, त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच टेन्शन वाढलय.
टीम इंडियासाठी मोठा झटका होता
भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दुखापत झाली. बॅटिंग करताना जाडेजाने वेगात 1 रन्स पळून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळालं नाही. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने उत्तम फिल्डिंगच प्रदर्शन करत जाडेजाला रनआऊट केलं. जाडेजाच रनआऊट होणं हा टीम इंडियासाठी मोठा झटका होता. कारण त्यानंतर टीम इंडियाच्या विजयाची शक्यता कमी होत गेली. अखेरीस पराभवच पदरी पडला.
द्रविड यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही
बाद होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना जाडेजा अडखळत चालत होता. जाडेजाला हॅमस्ट्रिंग त्रास सुरु झाला. मॅचनंतर कोच राहुल द्रविड यांनी या बद्दल काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही. PTI च्या रिपोर्ट्नुसार द्रविड यांनी सांगितलं की, “या बद्दल मी टीमच्या फिजियोशी बोललेलो नाहीय. त्यामुळे हे किती गंभीर आहे, या बद्दल काही सांगू शकत नाही”
त्याच न खेळण म्हणजे मोठ नुकसान
रिपोर्टनुसार, सीरिजच्या पुढच्या कसोटी सामन्यात कधी खेळणार? त्यावरुनच हॅमस्ट्रिंगची दुखापत किती गंभीर आहे, ते स्पष्ट होईल. हॅमस्ट्रिंगची दुखापत किरकोळ असली, तरी मॅच फिट होण्यासाठी कमीत कमी एक आठवड्याचा वेळ लागतो. पुढचा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरु होणार आहे. जाडेजा कदाचित त्या कसोटी भसामन्यात खेळणार नाही. जाडेजाच न खेळण मोठ नुकसान आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये त्याने 87 धावा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 2 रन्सवर बाद झाला. दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याटीमटीम इंडिया इंडियाने 5 विकेट काढल्या.