WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा डाव सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या रहाणेला अर्धशकापासून 1 धाव दूर असताना न्यूझीलंडच्या संघाने बाद केलं.

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली 'ही' युक्ती, रहाणे फसला जाळ्यात
अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 5:08 PM

साऊथॅम्प्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा डाव सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या रहाणेला अर्धशकापासून 1 धाव दूर असताना न्यूझीलंडच्या संघाने बाद केलं. पण ही विकेट न्य़ूझीलंडला सहजासहजी मिळाली नव्हती, त्यासाठी त्यांनी एक खास प्लॅन तयार केला होता. ज्यात दुर्देवाने रहाणेही फसला आणि एका उत्कृष्ठ संयमी खेळीचा शेवट झाला. (In ICC WTC Final New Zealand Got Indias Ajinkya Rahane Wicket With Perfect Plan)

काय होता न्यूझीलंडचा ‘प्लॅन’

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 100 हून अधिक बॉल खेळला होता. बराच काळ क्रिजवर असणाऱ्या रहाणने 46 धावांवर असताना स्केवर लेगला एक उत्कृष्ट शॉट खेळत 3 धावा केल्या. ज्यानंतर तो केवळ 1 धाव दूर होता आपल्या अर्धशतपासून त्याच वेळी रहाणे हात खोलतो आहे हे कळताच न्यूझीलंडने स्केवर लेगला आणखी एक खेळाडू ठेवत तब्बल पाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी ठेवले. त्यानंतरच्याच नील वॅगनरच्या बॉलवर रहाणेने पुन्हा पुल शॉट खेळला जो थेट लॅथम याच्या हातात गेला आणि रहाणे बाद झाला.

रहाणेची खेळी वाखाणण्याजोगी

रहाणे जरी न्यूझीलंडच्या जाळ्यात अडकला असला तरी त्याने एक उपकर्णधार म्हणून केलेली खेळी नक्कीच उल्लेखणीय होती. काही वेळातच दोन सेट सलामीवीरांनंतर पुजारा सारखा खेळाडू बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराच सोबत रहाणेने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यात त्याला यशही आलं. मात्र अखेर अर्धशतकापासून 1 धाव दूर असताना रहाणे बाद झाला. त्याने 117 बॉल्समध्ये 49 धावा केल्या ज्यात 5 चौकारांचा समावेश होता.

हे ही वाचा :

ICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला

Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे

(In ICC WTC Final New Zealand Got Indias Ajinkya Rahane Wicket With Perfect Plan)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.