WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यातील भारताचा पहिला डाव खराब करण्यात न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा सिंहाचा वाटा होता. त्याने विराट, रोहित आणि ऋषभ हे महत्त्वाचे गडी बाद केले.
साऊथॅम्प्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा डाव सावरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्णधार विराटसह (Virat Kohli) ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) विकेट घेणारा खेळाडू एकच आहे. भारताचे सर्व महत्त्वाचे एक्क्यांसह एकूण 5 गडी बाद करणारा हा खेळाडू आहे ‘काईल जॅमिसन'(Kyle Jamieson). तब्बल 6 फुट 8 इंच इतकी उंची असणाऱ्या जॅमिसनने भारतीय संघाची हालत खराब करुन टाकली. भारताच्या पहिल्या डावात दोन्ही दिवशीच्या पहिल्या विकेट्स जेमिसननेच घेतल्या. (In ICC WTC Final New Zealands Kyle Jamieson Took Important Wickets of Team India)
सर्वात आधी सामन्याच्या सुरुवातीला भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात करुन दिली. मात्र रोहित 34 धावांवर खेळत असताना 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जेमिसनने आपला पहिला शिकार केला आणि सलामीवीर रोहतला तंबूत धाडलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट आणि रहाणेने खेळाला सुरुवात करताच तीन धावा होताच जेमिसनने 67 व्या ओव्हरमध्ये कोहलीला बाद करत आपली दुसरी शिकार केली. ज्यानंतर काही वेळातच 73 व्या ओव्हरमध्ये जेमिसनने पंतला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. त्यानंतर 92 व्या ओव्हरमध्ये आधी इशांत आणि नंतर बुमराह असे लागोपाठ दोन बळी घेत जेमिसनने भारतीय संघाला पुरतं हैरान करुन सोडलं.
रहाणेला खास ‘प्लॅन’ करुन केलं बाद
एकीकडे जॅमिसन सर्व महत्त्वाचे विकेट्स मिळवत असताना त्याला पुरुन उरला होता तो एकमेव अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). त्यामुळे अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने एक खास युक्ती वापरली. रहाणे 100 हून अधिक बॉल खेळला होता. बराच काळ क्रिजवर असणाऱ्या रहाणने 46 धावांवर असताना स्केवर लेगला एक उत्कृष्ट शॉट खेळत 3 धावा केल्या. ज्यानंतर तो केवळ 1 धाव दूर होता आपल्या अर्धशतपासून त्याच वेळी रहाणे हात खोलतो आहे हे कळताच न्यूझीलंडने स्केवर लेगला आणखी एक खेळाडू ठेवत तब्बल पाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी ठेवले. त्यानंतरच्याच नील वॅगनरच्या बॉलवर रहाणेने पुन्हा पुल शॉट खेळला जो थेट लॅथम याच्या हातात गेला आणि रहाणे बाद झाला.
हे ही वाचा :
Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे
(In ICC WTC Final New Zealands Kyle Jamieson Took Important Wickets of Team India)