VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात उत्तम गोलंदाजी करत एक विकेटही मिळवला. पण त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याने केलेल्या एका कृतीमुळे त्याची अधिक वाह वाह होत आहे.

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ
कृणाल पंड्या
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 4:25 PM

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात कोलंबोच्या आर.प्रेमदास स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. ज्यामध्ये शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) कर्णधारीखाली नवख्या भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत भारताला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये भारतीय संघाने कमाल दाखवली. दरम्यान गोलंदाजीत अष्टपैलू कृणाल पांड्याने (Krunal Pandya) उत्कृष्ट गोलंदाजी करत अत्यंत कमी रनांच्या बदल्यात एक विकेटही पटकावला. पण याचवेळी त्याने केलेली एक कृती पाहून सर्वचजण त्याचे कौतुक करत आहेत.

सामन्यात कृणाल 22 वी ओव्हर फेकत होता. ओव्हरच्या तिसरा बॉल स्ट्राईकवर असणाऱ्या धनंजय डी सिल्वा याने सरळ मारला. तो बॉल अडवण्यासाठी कृणालने झेप घेतली आणि तो नॉन स्ट्राइकवर उभा फलंदाज चारिथा असालंकाचा धडकला. पण असे होताच उठून कृणालने लगेचच चारिथाला मिठी मारत खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले.

काय झालं मॅचमध्ये?

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत श्रीलंकेची वरची फळी नेस्तनाबूत केली. पण कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(In IND vs SL Indian All Rounder Krunal Pandya Lovely Gesture During Bowling)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.