AUSW vs INDW, 2nd ODI: नो बॉलवर कॅच झेलून जल्लोष, भारतीय महिलांचा मोठा पराभव, मालिकाही गमावली
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात भारतीस संघाला अगदी थोडक्यात पराभव पत्करावा लागला. यामुळे सामन्यासह मालिकाही भारताच्या हातातून निसटली आहे.
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पण या दौऱ्याच्या दुसऱ्याच सामन्यात भारतीय महिलांना एका दुर्देवी पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर या पराभवाला दुर्देवी म्हणण्यामागील कारण म्हणजे अगदी जिंकलेला हाता तोंडाशी आलेला सामना भारतीय महिलांना थोडक्यात गमवावा लागला. निमित्त ठरलं एक ‘नो बॉल.’
अगदी रोमहर्षक झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. ज्यावेळी भारताची अनुभवी झूलन गोस्वामीने चेंडू टाकला आणि समोरच्या खेळाडूला बाद देखील केलं. पण हाच चेंडू नो बॉल करार देण्यात आल्याने पुढच्याच चेंडूवर दोन धावा घेत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ची आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे.
#TeamIndia miss out by the barest of margins as Australia win the second #AUSvIND WODI in Mackay!
Scorecard ? https://t.co/18LSsNbvgw pic.twitter.com/mgFeUtNIXB
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2021
असा झाला सामना
सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांनी उत्तम खेळाचे दर्शन घडवले. भारताने 50 ओव्हरमध्ये सात विकेट्सच्या बदल्यात 274 धावांचा डोंगर उभा केला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 275 धावांचे लक्ष्य होते. भारताकडून स्टार फलंदाज स्मृति मांधना (Smriti Mandhana) हिने 86 धावांची दमदार खेळी केली. तिने या खेळीत तब्बल 11 चौकार लगावले. तिच्यासह रिचा घोषणने देखील 44 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 275 धावांचे आव्हान दिले.
बेथ मूनीचं शतक आणि ऑस्ट्रेलियाचा विजय
275 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खास झाली नाही. सुरुवातीला एलिसा पेरी (2), एश्ले गार्डनर (12) स्वस्तात बाद झाले. पण बेथ मूनीने दमदार शतक ठोकलं. तिच्या नाबाद 125 धावांनी ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा करुन दिला. त्याशिवाय ताहिला मॅक्ग्राने देखील 74 धावांची दमदार खेळी केली. पण अखेरीस निकोला कॅरीने नाबाद 39 धावांनी ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला.
एक नो बॉल आणि भारताचा पराभव
अखेरचं षटक भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी टाकत होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 13 धावांची गरज होती. ज्यानंतर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना निकोला कॅरी झेलबाद झाली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद देखील साजरा करायला सुरुवात केली. पण थर्ड अंपायरने चेंडूची उंची अधिक असल्याने नो-बॉल दिला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर 2 धावा करत सामना जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ची आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. दरम्यान हा चेंडू नो बॉल नसल्याचे काहींचे म्हणणे असल्याने त्यावर सोशल मीडियावर वाद सुरु होता. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने संबधित बॉलचा व्हिडीओ ट्विटरला टाकत नो बॉल आहे का? असा मिश्किल प्रश्न विचारला आहे.
No ball? Y/N#AUSvIND pic.twitter.com/QP70Obgqbl
— cricket.com.au (@cricketcomau) September 24, 2021
हे ही वाचा
Hardik Pandya : मुंबईच्या दोन्ही सामन्यात संधी नाही, हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातूनही बाहेर पडणार?
पहिल्या T20 विश्वविजयाला 14 वर्षे पूर्ण, प्लेईंग इलेव्हनमधील एकमेव खेळाडूची 2021 विश्वचषकासाठी निवड!
(In India vs Australia Womens Cricket Matche Indian Women Lost thriling game with one No ball)