IND vs ENG: सामनावीर पुरस्कार मिळूनही रोहित म्हणतो खरा हिरो तर ‘हा’ खेळाडू, ओव्हल कसोटीनंतर रोहित शर्माच मत

चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक होते, ज्याच्या जोरावरच भारताने एक तगडे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले.

IND vs ENG: सामनावीर पुरस्कार मिळूनही रोहित म्हणतो खरा हिरो तर 'हा' खेळाडू, ओव्हल कसोटीनंतर रोहित शर्माच मत
रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 11:01 AM

लंडन : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket team) ओव्हलच्या मैदानावर (Oval Test)  50 वर्षानंतर एक दमदार विजय मिळवत इंग्लंविरुद्धच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. तेही छोट्या मोठ्या नाही तर तब्बल 157 धावांनी ही हा विजय मिळवला आहे. तर या दमदार विजयानंतर सर्वच भारतीय खेळाडूंचे कौतुक होत आहे. पण एका कोणत्यातरी खेळाडूला सामनावीराचा (Man Of the Match) पुरस्कार द्यावा लागतो. हा पुरस्कार परदेशी भूमीवर पहिले शतक झळकावणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आला.  पण शर्माच्या मते मात्र सामन्यात सर्वात उत्कृष्ट खेळी करणारा खेळाडू कोणी दुसराच आहे.

भारताचा सालामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या डावात केएल राहुल सोबत एक आश्वासक सुरुवात केली. पण राहुल बाद झाल्यानंतही शर्मा न डगमगता खेळत होता. त्याने 127 धावा करत शानदार शतक ठोकलं. परदेशातील या पहिल्या शतकासोहत त्याने दुसऱ्या विकेटसाठी पुजारासोबत 153 धावंची भागिदारी रचली. ज्यामुळे भारताला सामन्यात एका मजबूत स्थानी आणलं. ज्यामुळे रोहितला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं.

रोहित म्हणतो शार्दूल विजयाचा खरा शिल्पकार

सामनावीर मिळाल्यानंतर रोहित शर्माने पुरस्कार तर स्वीकारला पण एक महत्त्वाची गोष्ट म्हटला. त्याने सर्वांसमोर ‘खरा सामनावीर आणि भारताच्या विजयाचा हिरो’ म्हणून शार्दुल ठाकुरचं नाव घेतलं. तो म्हणाला, “मला वाटतं या सन्मानाचा खरा हकदार मी नाही शार्दूल ठाकूर आहे. माझ्या मते हा पुरस्कार त्याला मिळायला हवा होता.” रोहितच्या या वक्तव्यामुळे शार्दूलचा आत्मविश्वास तर वाढला असेलच पण यातून रोहितची खेळाडू वृत्तीही पाहायला मिळाली.

काय केलं होत शार्दूलने चौथ्या कसोटीत?

ओव्हलवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात शार्दूल दोन सामन्यांनंतर खेळायला उतरला. पहिल्या डावात भारताचा स्कोअर होता 117 धावांवर सहा विकेट. अशा स्थितीत शार्दूल खेळायला उतरला आणि तो भारताला 191 पर्यंत घेऊन गेला. पहिल्या डावात शार्दूलनं 36 बॉल्समध्ये शानदार 57 रन्स ठोकल्या. यात त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

एवढच नाही तर दुसऱ्या डावातही शार्दूलनं कमाल केली. विशेष म्हणजे पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात शार्दूलनं मोठी जबाबदारी निभावली. दुसऱ्या डावात भारतानं 312 रन्सवर सहा विकेट गमावल्या त्यावेळेस शार्दूल मैदानात उतरला. टीम इंडियाकडे 211 धावांची आघाडी होती. त्यानंतर शार्दूलनं ऋषभ पंतसोबत 100 धावांची महत्वाची भागीदारी करत टीम इंडियाची आघाडी 300 पार पोहोचवली. शार्दूलच्याच खेळाच्या जोरावर टीम इंडिया इंग्लंडसमोर 368 धावाचं आव्हान उभं करु शकली. शार्दूलने दुसऱ्या डावात 72 चेंडूत 60 धावांची महत्वाची खेळी खेळली.

फलंदाजीत शार्दुल चमकलाच, त्यासोबत त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला होता. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु केली होती. सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी सलामीसाठी शतकी (100) भागीदारी केली. परंतु लार्ड शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बर्न्सचा 50 धावांवर असताना काटा काढला. त्यानंतर या मालिकेत सातत्याने भारतीय गोलंदाजांची पिसं काढणारा कर्णधार जो रुट मात्र या डावातही खेळपट्टीला चिकटला होता. मात्र पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुलने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने रुटला त्रिफळाचित करत भारताचा विजय पक्का केला. या कामगिरीमुळेच त्याला सामनावीर मिळायला हवं होतं असा प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतर बातम्या

IND vs ENG : रोहितचं शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी, भारताची इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत आघाडी

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत

(In India vs England oval test after indias win Rohit Sharma name Shardul Thakur most deserving player of the match)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.