IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला आतापर्यंत 154 धावांची आघाडी मिळाली आहे.

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल
बाल्कनीतून हातवारे करताना रोहित-विराट
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 12:36 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु आहे. सामन्यात चार दिवसांचा खेळा झाला असून सर्वात पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत खेळणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. सर्व दिग्गज बाद झाले असताना आता सर्व फलंदाजीची मदार ऋषभ पंतच्या खांद्यावर आली आहे. अशावेळी पंतला मैदानाबाहेर बसून विराट आणि रोहित जोडी कशी मदत करत आहेत, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण या मदतीमुळेच इंग्लंडचा कर्णधार जो रुट वैतागला असल्याचेही दिसून आले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटीतील चौथा दिवस अतिशय मजेशीररित्या किंबहुना ड्रामॅटिकली संपला. दिवसाच्या 90 ओव्हर्सचा कोटा संपायला 8 ओव्हर शिल्लक होत्या. पण त्याच वेळी खराब प्रकाशमानामुळे पंचानी दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी बाल्कनीतून रोहित आणि विराट हे पंतला खराब प्रकाशमान आहे, खेळ थांबवण्याची विनंती कर अशाप्रकारचे इशारे करत होते. त्यामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेताच इंग्लंडचा कर्णधार जो रुट ज्याला दिवसाखेर आणखी विकेट्स मिळवण्याची इच्छा होती. तो काहीसा वैतागला. तर सर्वात आधी पाहूया विराट आणि रोहितचा पंतला इशारे करतानाचा व्हिडीओ…

जो रुट नाराज

दिवसभराचा खेळ संपण्यासाठी 8 ओव्हर्स शिल्लक असताना पंचानी खेळ थांबवला. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार काहीसा नाराज झाला. सर्व मोठ्या फलंदाजाना बाद केल्यानंतर केवळ शेवटचा महत्त्वाचा फलंदाज पंतला दिवसाखेर बाद करण्याचा त्याचा मनसुबा फेल गेला. त्यामुळे रुट वैतागल्याचे साफ दिसून आले. तो त्याच वेळी पंतला काही म्हणाला देखील हा रुट आणि पंतचा फोटोही व्हायरल होत आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(In india vs england second test rohit and virat prompt rishabh Pant To Stop Play Due To Bad light)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.