T20 World Cup 2021, India vs England: सराव सामन्यात भारताची सरशी, इंग्लडवर 7 गडी राखून विजय
भारताच्या विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी भारत सराव सामना खेळत आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सराव सामना पार पडला. ज्यामध्ये भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला.
T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असल्याने सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातीलच एक सामना आज दुबईच्या मैदानात पार पडला. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) आमने-सामने होते.
Impressive batting performance ? Fine bowling display ?#TeamIndia beat England & win their first warm-up game. ? ?#INDvENG #T20WorldCup
?: Getty Images pic.twitter.com/jIBgYFqOjz
— BCCI (@BCCI) October 18, 2021
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर इंग्लंडने मात्र दमदार फलंदाजी करत 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये बेयरस्टोच्या 49, लियामच्या 30 धावांसह मोईन अलीने अखेरच्या काही षटकात 20 चेंडूत केलेल्या नाबाद 43 धावांनी धावसंख्या वाढवण्यात मोठं योगदान दिलं. ज्यामुळे संघाचा स्कोर भलामोठा झाला. भारताकडून गोलंदाजीत शमीने उत्तम गोलंदाजी करत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. तर राहुल चाहरने आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ज्यामुळे भारताला विजयासाठी 189 धावांचे आव्हान होते.
किशन-राहुल जोडीची धडाकेबाज फलंदाजी
189 अशा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेले भारतीय फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या लयीत होते. आज रोहित शर्मा नसल्याने केएल राहुल सोबत इशान किशन सलामीला आला. यावेळी 82 धावापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. तोवर राहुलने 51 धावा करत अर्धशतकही लगावलं. राहुल अर्धशतक होताच बाद झाला. ज्यानंतर कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण इशानने मात्र धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली पण अखेर 70 धावा झाल्या असताना त्याने विश्रांती घेण्यासाठी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर ऋषभ पंतने (नाबाद 29) आणि हार्दीकने (नाबाद 12) एक ओव्हर राखून भारताला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा
…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा
कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?
T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो
(In India vs England T20 World Cups Warm up Match India Won match with 7 Wickets in Hands)