IND vs ENG: 91 वर्षांपूर्वीचा ब्रॅडमन यांचा विक्रम तोडण्याच्या उंबरठ्यावर जो रुट, भारताविरुद्ध करणार ‘ही’ धमाकेदार कामगिरी

इंग्लंडकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलग तिसरं शतक ठोकलं. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली.

IND vs ENG: 91 वर्षांपूर्वीचा ब्रॅडमन यांचा विक्रम तोडण्याच्या उंबरठ्यावर जो रुट, भारताविरुद्ध करणार 'ही' धमाकेदार कामगिरी
जो रुट
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 4:33 PM

लंडन : इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येत आहे. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात रुट अप्रतिम फलंदाजी करत धावांचा डोंगर रचतच चालला आहे. 5 कसोटी सामन्यांतील तीन कसोटी सामन्यातच त्याने 3 शतकं ठोकली आहेत. तिसऱ्या कसोटीतही रुटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने चांगली आघाडी मिळवली. पण सोबतच रूट एक 91 वर्ष जुना रेकॉर्ड तोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांचा असून आता तो लवकरच रुटच्या नावे होऊ शकतो.

जो रूटने हेडिंग्ले येथील तिसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंजच्या पहिल्या डावात 165 चेंडूत 121 धावा करत शतक ठोकलं. त्याने यावेळी 14 चौकार लगावले. विशेष म्हणजे या मालिकेतील हे रुटचे तिसरे शतक असून त्याने एक अर्धशतकही लगावलं आहे. या तीन शतकांच्या जोरावर रुटने मालिकेत तीन कसोटी सामन्यातील पाच डावा 126.57 च्या सरासरीने 507 रन्स बनवले आहेत. तो अजून पाच डाव भारताविरुद्ध या मालिकेत खेळणार आहे. यादरम्यानही त्याने अशीच फलंदाजी केल्यास तो 1930 मधील सर डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड तोडू शकतो.

रूटकडे ब्रॅडमनचा 974 धावांचा रेकॉर्ड तोडण्याची संधी

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930 या एका वर्षात एका संघाविरुद्ध सर्वाधिक म्हणजे 7 डावात 974 धावा केल्या आहेत. ज्यानंतर 1974 मध्ये वेस्ट इंडीजचे  दिग्गज खेळाडू क्लाइव लॉयड यांनी एका वर्षात भारताविरुद्द 14 डावात 903 रन्स बनवले. काही धावा मागे राहिल्याने ते ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड तोडू शकले नाही. पण रुटने 2021 या एका वर्षात भारताविरुद्ध 13 डावांत एकूण 875 धावा केल्या आहेत. त्यामुळे अजून 100 धावा केल्यास तो ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड तोडू शकेल.

इतर बातम्या

IND vs ENG : रोहितची एक चूक भारताला पडली महाग, तिसऱ्या कसोटीत मोठं नुकसान, पाहा VIDEO

विराट सातव्यांदा अँडरसनचा बळी, कोहलीला खेळताच येईना, गावसकर म्हणाले, आताच्या आता सचिनला कॉल कर!

IND vs ENG : इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्कोर विचारत सिराजला चिडवलं, सिराजनेही चोख प्रत्युत्तर देत केलं शांत, पाहा नेमकं काय घडलं?

(In india vs england test Englands captain joe root may break 91 year old world record set by don bradman of most runs against same team in one year)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.