IND vs ENG Women : भारतीय महिला यष्टीरक्षकाने दाखवला ‘धोनी अवतार’, क्षणार्धात इंग्लंडच्या फलंदाजाला केलं बाद, पाहा Video

भारत विरुद्ध इंग्लंडच्या (India vs England T20) महिलांमध्ये शुक्रवारी टी-20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात बरेच व्यत्यय आले. अखेर भारतीय संघ सामना पराभूत झाला मात्र या सामन्यात भारताची यष्टीरक्षक रिचा घोषने केलेली एक स्टम्पिग खरच वाखाणण्याजोगी आहे.

IND vs ENG Women : भारतीय महिला यष्टीरक्षकाने दाखवला 'धोनी अवतार', क्षणार्धात इंग्लंडच्या फलंदाजाला केलं बाद, पाहा Video
रिचा घोष स्टम्पिग
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 1:45 PM

India vs England Women T 20 : पुरुष संंघासह भारतीय महिला संघही इंग्लंडच्या दौऱ्याव आहे. एकमेव टेस्ट अनिर्णीत झाल्यानंतर भारतीय महिला वन डे मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्या. आता टी-20 मालिकेला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात भारतीय महिलांचा 18 धावांनी पराभव झाला. पण या सामन्यात काही अशा घटना घडल्या ज्यामुळे भारतीय महिलाही उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळतात पुन्हा एकदा समोर आले. ज्यात भारताच्या हरलीन देओल (Harleen Deol) हिने टिपलेल्या एका सुपरकॅचचा व्हिडीओ सुपर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे यष्टीरक्षक रिचा घोष (Richa Ghosh) हिने इंग्लंडच्या सोफिया डंकलेला (Sophia Dunkley) ज्याप्रकारे स्टम्पिग करत बाद केलं ते पाहून पुन्हा एकदा महान यष्टीरक्षक धोनीच सर्वांना आठवला. या स्टम्पिगचा व्हिडीओही इंटरनेवर व्हायरल होत आहे. (In India vs England Women 1st T 20 Richa Ghosh Did Awsome Stumping Like MS Dhoni See Video)

सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. यावेळी शिखा पांडे (Shikha Pandey) च्या 19 व्या ओव्हरमध्येच दोन्ही अप्रतिम घटना घडला. आधी 5 व्या चेंडूवर हरलीनने अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर यष्टीरक्षक रिचाने अगदी धोनी स्टाईल वेगवान अशी स्टम्पिग करत इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकले हिला बाद केलं. हे स्टम्पिग इतके चपळाईने करण्यात आले होते की मैदानावरील पंचालाही नेमका निर्णय देता आला नाही आणि सर्व प्रकरण थर्ड अम्पायरकडे गेले. त्यांनी कॅमेऱ्याच्या प्रत्येक बाजूने पाहून बाद निर्णय दिला. दरम्यान या स्टम्पिगचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून रिचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मैदान कुणी मारलं…?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावून 177 धावा केल्या. परंतु पावसाने व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचा टप्पा पार करावा लागणार होता. परंतु निर्धारित षटकांमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या. या सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला.

हे ही वाचा :

Birthday Special : जन्मानंतर रुग्णालयातच बदली झाला, पुढे जाऊन जगातील महान फलंदाज बनत गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला, 4 सामन्यांत 774 धावा ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू

Happy Birthday Sunil Gavaskar : वीरेंद्र सेहवागच्या गावस्करांना हटके शुभेच्छा, मजेशीर व्हिडीओ केला पोस्ट

Video : भारताच्या हरलीन देओलचा सुपर कॅच, नेटकरी म्हणतायत, ‘जाडेजालाही फिकं पाडलं’!

(In India vs England Women 1st T 20 Richa Ghosh Did Awsome Stumping Like MS Dhoni See Video)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.