T20 World Cup: ‘हा’ आहे भारत, ‘हे’ आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्यातील पंतचा ‘तो’ VIDEO व्हायरल

भारताने विश्वचषकाच्या अखेरच्या सामन्यात नामिबीयाला नमवत स्पर्धेचा शेवट गोड केला. पण या सामन्यात आणखी एक गोड गोष्ट घडली. ऋषभ पंतचा खेळाप्रतिचा सन्मान एका कृत्यातून दिसून आला.

T20 World Cup: 'हा' आहे भारत, 'हे' आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्यातील पंतचा 'तो' VIDEO व्हायरल
ऋषभ पंत संघासोबत
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 4:27 PM

T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket team) यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अतिशय सुमार कामगिरी केली. सुरुवातीचे दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत पुनरागमन करता आलचं नाही आणि सेमीफायनलपूर्वीच भारत स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची मनं तुटली असली तरी अखेरच्या नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या एका कृतीने साऱ्याच भारतीयांची मनं तर जिंकलीच पण भारतासाठी क्रिकेट म्हणजे काय हे पण दाखवून दिलं.

तर झालं असं, भारत आणि नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात नामिबीयाचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. सामन्यातील 9 व्या ओव्हरमध्ये निकॉलने रन आउट होण्यापासून वाचण्याकरत झेप घेतली. त्यावेळी भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा पाय बॅटला लागला. त्यावेळी लगेचच ऋषभने बॅटच्या पाया पडत क्रिकेट आणि त्याची साधनं भारताला किती महत्त्वाची आहेत हे दाखवून दिलं. भारतात क्रिकेटलाच नाही तर कोणताही व्यक्ती करत असलेल्या कामाप्रती तो किती सन्मान देतो हे या कृतीतून दाखवून दिलं. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतं असून नेटकरी या व्हिडीओला खूप प्रेम देत आहेत.

असा पार पडला सामना

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय़ अगदी बरोबर असल्याचं दाखवत फिरकी गोलंदाजीसह वेगवान गोलंदाजीने नामिबिया संघाला 132 धावांत रोखलं. यावेळी यावेळी फिरकीपटू आश्विन आणि जाडेजाने प्रत्येकी 3 तर बुमराहने 2 विकेट घेतले. नामिबीयाकडून डेविड विसे याने सर्वाधिक 26 धावा केल्या.

133 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने सुरुवातच जबरदस्त केली.  सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अर्धशतकं झळकावत सामना एकहाती भारताच्या पारड्यातचं ठेवला. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने राहुलला 25 धावांची साथ देत विजय पक्का केला. सामन्यात रोहितने 37 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकार ठोकत 56 धावा केल्या. तर राहुलनेही अर्धशतक ठोकत 36 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकार ठोकत नाबाद 54 धावा केल्या.

इतर बातम्या

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

8 चेंडूत ठोकल्या 40 धावा, रहाणे-शॉसमोर छत्तीसगडचा फलंदाज पडला भारी, मुंबईचा संघ 1 रनने पराभूत

(In india vs namibia match Rishabh pant pays respect to namibia players bat video went viral)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.