India vs New zealand Playing 11: सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर, भारतीय संघात दोन मोठे बदल, लॉर्ड शार्दूलला मिळाली संधी
भारत विरुद्ध न्यूझीलंड या बहुप्रतिक्षित सामन्याला सुरुवात होत असून भारताने आजही नाणेफेक गमावली आहे. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडल्याने भारताला फलंदाजी करायची आहे.
T20 World Cup 2021 : भारत आणि न्यूझीलंड या सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आहे. यावेळी भारतीय संघाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार सूर्यकुमारच्या जागी इशान किशन खेळणार आहे. तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी दिली आहे.
फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे मेडिकल टीमने विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे तो हॉटेलमध्ये विश्रांती करणार आहे. त्याच्याजागी इशान किशनला संधी मिळाली आहे. तर एक अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भुवनेश्वरच्या जागी लॉर्ड शार्दूल मैदानात उतरणार आहे.
? UPDATE: Suryakumar Yadav complained of back spasms. He has been advised rest by the BCCI Medical Team and has stayed back at the team hotel.#TeamIndia #T20WorldCup #INDvNZ
— BCCI (@BCCI) October 31, 2021
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.
हे ही वाचा :
(In India vs New zealand match suryakumar yadav replaced by ishan kishan and shardul thakur comes in in place of bhuvneshwar kumar)