IND vs NZ: रोहित शर्माच्या कर्णधार असताना विराट संघात काय करणार?, रोहितनेच दिलं उत्तर
उद्यापासून (17 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून यावेळी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा हा काम पाहणार आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) आता एका नव्या आव्हानाचा सामना करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी20 आणि कसोटी मालिका सुरु होणार आहे. यावेळी टी20 संघाचा कर्णधार रोहित असून मुख्य प्रशिक्षक म्हणूनही राहुल द्रविड जबाबदारी सांभाळणार आहे. उद्यापासून (17 नोव्हेंबर) या सामन्यांना सुरुवात होत असल्याने त्यापूर्वी राहुल द्रविड आणि रोहित यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या मुद्ध्यांबाबत माहिती दिली. यावेळी रोहितला विराट कोहलीचा आता संघात काय स्थान असेल असा प्रश्नही विचारण्यात आला ज्याला रोहितनेही नेमकं उत्तर दिलं.
रोहितला विराटबद्दल विचारलं असता रोहित म्हणाला,“तो (कोहली) आजपर्यंत संघासाठी जे करत होता तेच करणार आहे. तो जेव्हाही संघासाठी खेळतो त्याची एक वेगळी छाप सोडत असतो. विराट संघात असेल तर संघ मजबूत होतो. कारण त्याच्याकडे खूप अनुभव असून तो एकर उत्कष्ट फलंदाज आहे.”
नवे सामने-नवा संघ
न्यूझीलंडच्या दौऱ्याला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. आधी 3 टी20 आणि नंतर 2 कसोटी सामने खेळवले जातील. दरम्यान भारतीय संघात मागील काही दिवसांत झालेल्या बदलांनुसार टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराटच्या जागी रोहित काम पाहिल. संघाचं प्रशिक्षक पदही रवी शास्त्रींकडून राहुल द्रविडकडे देण्यात आलं आहे. टी20 आणि कसोटी सामन्यांसाठी नवे संघही जाहीर करण्यात आले आहेत.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
असं आहे वेळापत्रक-
पहिला सामना- बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी सात वाजल्यापासून
दुसरा सामना- शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी सात वाजल्यापासून
तिसरा सामना- रविवार-21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी सात वाजल्यापासून
इतर बातम्या
विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता
हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त
(In India vs New zealand Series whats virat contribution in team says rohit sharma)