WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, ‘हा’ हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर

भारत आणि न्‍यूझीलंड या संघात वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून सुरु होणार आहे. त्याआधी इंग्लंड विरोधात न्यूझीलंड कसोटी सामने खेळणार आहे

WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, 'हा' हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर
New Zealand test team
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 4:38 PM

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटचा वर्ल्‍ड कप समजला जाणारा वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final 2021) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडसोबत सराव म्हणून कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांत न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. WTC Final आधी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हा निर्णय बोल्टने घेतल्याची माहिती समोर आली आहे. (In India vs New Zealand WTC Final Trent Boult Will Not play says report)

ट्रेन्ट बोल्ट खेळणार नसल्याचा मोठा तोटा न्यूझीलंडच्या संघाला होऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या सामन्यात इंग्लंड विरोधात बोल्टची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे त्याचे संघात नसणे इंग्लंडला फायदेशीर ठरु शकते. तर न्यूझीलंडला मात्र याचा मोठा तोटा होऊ शकतो. न्‍यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्‍टीड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले. ”माझ्या मते इंग्लंड विरुद्धच्या सामन्या ट्रेन्ट बोल्‍ट खेळणार नाही. बोल्‍ट शुक्रवारी इंग्लंडला येणार असून आम्हाला WTC Final साठी त्याला फिट ठेवायचे आहे.”

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊदम्पटन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल

(In India vs New Zealand WTC Final Trent Boult Will Not play says report)

हे ही वाचा :

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

India tour of England : भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर माजी कर्णधाराचा आक्षेप, सामन्यांच्या नियोजनावर वर्तविली नाराजी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.