IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी 84 धावांची भागिदारी करत भारताला तीन विकेट्सनी विजय मिळवून दिला.

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग
दीपक चाहर-भुवनेश्वर कुमार
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:51 AM

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मंगळवारी आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघावर (Sri Lanka Cricket Team) रोमहर्षक विजय मिळवला. सामन्यात तीन विकेट्सनी मात देत मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेतली. भारत श्रीलंकेने दिलेल्या 276 धावांचे लक्ष्य गाठताना 193 धावांवरच सात विकेट्स गमावून बसला होता. त्याचवेळी क्रिजवर दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ही जोडी आली. या दोघांनी 84 धावांची शानदार भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या अप्रतिम विजयानंतर सर्वच भारतीय क्रिकेट रसिकांना श्रीलंकेविरुद्ध भारताने खेळलेला चार वर्षापूर्वीचा एक सामना आठवला. ज्यात अशाच रोमहर्षक सामन्यात, श्रीलंकेविरुद्धच भारताने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे त्यावेळीही क्रिजवर भुवनेश्वर कुमारच होता.

तर ही गोष्ट आहे 2017 ची. भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत दुसरा सामना खेळत होता. यावेळी विजयासाठी आवश्यक लक्ष्य मिळवताना भारताचे सलामीचे फलंदाज एक एक करुन बाद झाले. पण त्याचवेळी क्रिजवर भुवनेश्वर कुमारने जगातील बेस्ट फिनिशर महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सोबत मिळून विजयी लक्ष्य पार केले आणि भारताला सामन्यात विजय मिळवून दिला. योगायोग म्हणजे तेव्हाही भारत 3 विकेट्सनेच जिंकला होता आणि भुवीसोबत भागिदारी करणारा खेळाडू हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचाच खेळाडू होता.

धोनीसोबत मिळून शतकी भागिदारी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2017 चा सामना 24 ऑगस्ट रोजी खेळवला गेला होता. सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत 236 रन केले. त्यानंतर भारताकडू शिखर धवन (49) आणि रोहित शर्मा (54) यांनी उत्तम भागिदारी करत एक चांगली सुरुवात दिली. पण नंतर एक एक करुन सर्व फलंदाज बाद होत गेले. 131 धावांवर भारताने सात विकेट्स गमावले होते. त्यावेळी कर्णधार धोनी आणि भुवनेश्वरने मैदानात येत उत्कृष्ठ भागिदारी रचली. यावेळी भुवनेश्वरने 80 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार खेचत नाबाद 53 धावा केल्या तर  धोनीने 68 चेंडूत एक चौकार ठोकत नाबाद 45 रन केले. हा सामना डकवर्थ लुइस नियमानुसार भारताने तीन विकेट्ने जिंकला.

हे ही वाचा :

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

(In India vs Sri lanka win deepak chahar and bhuvneshwar kumar reminds 2017 Partnership of ms dhoni and bhuvneshwar kumar)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.