IPL 2021: आधी विराटचं-मॅक्सवेलचं अर्धशतकं, मग हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई गारद, 54 धावांनी दारुण पराभव

पाच वेळा आयपीएलचा खिताब पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ आरसीबीच्या माऱ्यासमोर गारद झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा सोडता सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने मुंबईला 54 धावांनी पराभव चाखावा लागला आहे.

IPL 2021: आधी विराटचं-मॅक्सवेलचं अर्धशतकं, मग हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई गारद, 54 धावांनी दारुण पराभव
आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 12:45 AM

IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 39 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB vs MI) दारुण पराभव झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 54 धावांनी दमदार विजय मिळवला. आधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धडाकेबाज अर्धशतकं ठोकल्यानंतर गोलंदाजीवेळी हर्षल पटेलने (Harshal Patel) जबरदस्त हॅट्रीक घेत मुंबईची फलंदाजी भेदत सामना आरसीबीच्या खिशात घातला.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी घेतली. पण आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तम बोलिंग करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईचे फलंदाज 166 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातही दमदार झाली. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंंटन डिकॉक यांनी दमदार सुरुवातकेली. पण 57 धावांवर डिकॉक बाद झाला. ज्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. 43 धावा करुन रोहित बाद होताच एकामागोमाग एक फलंदाज बाद होतं गेले. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का काढला.

हर्षलचा भेदक मारा आणि मुंबई पराभूत

विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दीकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचीत करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीला विजय सोपा झाला. हर्षलने विकेट घेताच सर्व संघाने जल्लोष केला.

ग्लेन मॅक्सवेल सामनावीर

हर्षल पटेलने हॅट्रीक घेतली खरी पण सामन्यात बॅट आणि बॉल अशा दोन्हीने अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मॅक्सवेलने फलंदाजीवेळी 37 चेंडूत 56 धावा लगावल्या. ज्यानंतर गोलंदाजीवेळी 4 षटकात 23 धावा देत 2 विकेट्सही घेतल्या.

हे ही वाचा

आरसीबीच्या विजयात हर्षल पटेल चमकला, घेतली जबरदस्त हॅट्रीक, पाहा VIDEO

CSK vs KKR: पायातून रक्त वाहत असतानाही नाही सोडलं मैदान, ‘या’ खेळाडूचे फोटो पाहून चाहतेही भावूक

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

(In IPl 2021 MI vs RCB match Harshal Patels Hat trick let RCB won Match Over Mumbai indians with 54 runs)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.