उम्रान मलिक T20 Worldcup मध्ये भारतीय संघासोबत, IPL 2021 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकल्याबद्दल मिळाली संधी

यंदाच्या आयपीएलमध्ये दरवर्षीप्रमाणे अनेक युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरीने सर्वांचीत मनं जिंकली आहेत. यातीलच एक नाव म्हणजे युवा गोलंदाज उम्रान मलिक.

उम्रान मलिक T20 Worldcup मध्ये भारतीय संघासोबत, IPL 2021 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकल्याबद्दल मिळाली संधी
उम्रान मलिक
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 11:29 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगमधून दरवर्षी भारतीय क्रिकेटला नवनवे युवा क्रिकेटपटू भेटत असतात. यंदाही अशाच एक युवा गोलंदाजाने चमकदार कामगिरी करत सर्वांच लक्ष्य वेधून घेतलं आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघातून पदार्पण करणारा मूळचा काश्मीर येथील उम्रान मलिक (Umran Malik) सध्या चर्चेचा विषय आहे. अतिशय वेगवान आणि अचूक गोलंदाजी करणाऱ्या उम्रानने काही सामनेच खेळले असून यात खूप विकेट्स नसल्या मिळवल्या तरी वेगवान गोलंदाजीच्या जोरावर सर्वांच लक्ष्य वेधलं आहे. त्यामुळेच त्याला आगामी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) भारतीय संघासोबत नेट बोलर म्हणून सामिल करण्यात आलं आहे.

हैद्राबाद संघाचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची बाधा झाल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या  उम्रान मलिकने पहिल्याच सामन्यात एक रेकॉर्ड केला होता. उम्रान याने त्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तब्बल 150 kmph वेगाने चेंडू फेकला. आय़पीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतका वेगवान चेंडू फेकता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 152.85 kmph वेगाने चेंडू टाकत उम्रानने यंदाच्या पर्वातील सर्वात वेगवान चेंडूचा रेकॉर्डही तोडला. त्यामुळे त्याला आता भारतीय संघासोबत सामिल होता येत आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार भारतीय निवडकर्त्यांनी ठरवल्याप्रमाणे भारतीय फलंदाजाना सराव देण्याकरता मुख्य गोलंदासह नेट गोलंदाजांनाही सोबत ठेवण्यात येणार आहे. BCCI च्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार “उम्रान भारतीय संघासोबत नेट बोलर म्हणून राहिल. त्याने IPL मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांना चांगला सराव होईल.”

कोण आहे उम्रान मलिक?

सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उम्रान मलिक याला टी नटराजनच्या जागी संघात घेण्यात आलं. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा-

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(In IPL 2021 SRH fast bowler Umran Malik added with indian team as Net bowler for ICC T20 World Cup)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.