IPL New Team Auction 2021: आयपीएलमध्ये लखनौ आणि अहमदाबाद संघाची एन्ट्री, आरपी संजीव गोएन्का ग्रुपसह सीवीसी कॅपिटल कंपनीने जिंकला लिलाव

दुबई येथील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपताच, आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) 8 च्या जागी 10 संघ खेळवले जाणार असून नवे 2 संघ जाहीर झाले आहेत.

IPL New Team Auction 2021: आयपीएलमध्ये लखनौ आणि अहमदाबाद संघाची एन्ट्री, आरपी संजीव गोएन्का ग्रुपसह सीवीसी कॅपिटल कंपनीने जिंकला लिलाव
आयपीएल
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:18 PM

दुबई : नुकताच भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपला असून आता आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. आगामी आयपीएलमध्ये अर्थात IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. या दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यवसायिक आणि बड्या हस्तींमध्ये बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, मँचेस्टर युनायटेड, रणवीर सिंगआणि अरुबिदों अशा काहींनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत.

त्यानंतर आता RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुप्स आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने  लिलाव जिंकला आहे. गोएन्का ग्रुपने लखनौचा संघ 7 हजार 90 कोटी रुपये तर सीवीसी कॅपिटल कंपनीने अहमदाबाद संघ 5 हजार 625 कोटींना लिलावात विकत घेतला आहे.

12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघाची किंमत

दुबईमध्ये झालेल्या या लिलावात तब्बल 12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघ विकत घेण्यात आले आहेत. यावेळी  अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेडसारख्या बड्या कंपन्या आणि संघासह रणवीर सिंगसारखा अभिनेताही लिलाव प्रक्रियेत होता. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12 हजार कोटींहूनही अधिक आहे.

असा पार पडला लिलाव

या लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने दोन्ही संघाची बेस प्राईज अर्थात सुरुवाती किंमत 2 हजार कोटी इतकी ठेवली होती. त्यानुसार सर्व उपस्थितांनी बोली लावण्यास सुरुवात केली. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना तर सीवीसी कॅपिटल या प्रायव्हेट इक्वीटी फर्म अहमदाबाद संघ जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. याआधी सर्वात महाग संघ म्हटलं तर पुणे वॉरियर्स हा होता ज्याला सहारा ग्रुपने 370 मिलियन डॉलर इतकी असून मुंबईचा संघही 111.9 मिलियन डॉलरच्या घरात आहे. पण या दोन्ही संघाची किंमत यांच्यापेक्षाही अधिक आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?

इंग्लंड संघाची ताकद वाढणार, सर्वात बलाढ्य खेळाडू संघात परतणार

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

(In IPL 2022 Ahmedabad and Lucknow, teams newly joined, Ahmedabad owend by CVC Capital Company and RP Sanjiv Goenka Group gets Lucknow IPL franchise)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.