IPL 2023 : Virat Kohli च्या RCB ला सर्वात मोठा धक्का, वाढत चाललाय अडचणींचा डोंगर

IPL 2023 RCB News : RCB ला दिवसा दिसणार तारे. हा खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकला, तर त्याचा फटका नंतर आरसीबीला बसू शकतो. आरसीबीच्या टीमसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत.

IPL 2023 : Virat Kohli च्या RCB ला सर्वात मोठा धक्का, वाढत चाललाय अडचणींचा डोंगर
VIrat Kohli RCBImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 1:51 PM

IPL 2023 RCB News : IPL 2023 च्या सीजनला सुरुवात होण्याआधीच अनेक टीमचे प्रमुख खेळाडू टुर्नामेंटमधून बाहेर गेलेत. विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम सुद्धा याला अपवाद नाहीय. आरसीबीचा बॅट्समन विल जॅक्स दुखापतीमुळे टुर्नामेंटमधून बाहेर गेलाय. आता बातमी आहे की, त्यांचा एक मोठा मॅचविनर सीजन सुरु होण्याआधीच 7 मॅचसाठी बाहेर होऊ शकतो.

आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. RCB च्या गोलंदाजीची भिस्त त्याच्यावर होती. त्यामुळे टीमसाठी हा एक झटका आहे.

वर्तमानपत्राशी बोलताना दिले संकेत

जोश हेजलवूडला एकिलीस टेंडनची दुखापत झालीय. बातमी आहे की, तो कदाचित 7 सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र द एजच्या रिपोर्ट्नुसार, जोश हेझलवूड कदाचित आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खेळणार नाही. हेझलवूडने या वर्तमानपत्राशी बोलताना तसे संकेत दिलेत.

RCB चा हा गोलंदाज भारतात कधी येणार?

जोश हेजलवूडने द एजशी बोलताना तो 14 एप्रिलला भारतात रवाना होणार असल्याच सांगितलं. भारतात पोहोचल्यानंतर तो लगेच खेळणार नाही. एक आठवडा हेझलवूड आयपीएल सामन्यांमध्ये दिसणार नाही. या आठवड्यात तो त्याची गोलंदाजीची लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आरसीबीसाठी योगदान देण्याची अपेक्षा हेझलवूडने व्यक्त केलीय. आरसीबीने हेझलवूडला मागच्यावर्षी 7.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. यावर्षी त्याला रिटेन केलय. हेजलवूड आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून क्लियरन्स मिळवावा लागेल. मागच्या सीजनमध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा होता?

हेजलवूड आरसीबीसाठी पहिले सात सामने खेळू शकला नाही, तर तो त्यांच्यासाठी एक झटका असेल. हेजलवूडने मागच्या सीजनमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. या खेळाडूने मागच्या सीजनमध्ये 12 सामन्यात 20 विकेट काढले होते. बॉलिंग ही आरसीबीची कमकुवत बाजू आहे. प्रतिस्पर्धी टीम हेजलवूडच्या अनुपस्थितीत त्या कमजोरीचा फायदा उचलू शकतात.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.