IPL 2023 मध्ये Arjun Tendulkar ला मुंबईच्या प्लेइंग XI मध्ये संधी मिळू शकते, त्यामागे एक प्रमुख कारण

Mumbai Indians News : अर्जुन तेंडुलकरला IPL 2023 मध्ये संधी मिळू शकते, त्यामागे एक प्रमुख कारण आहे. अर्जुन तेंडुलकरच नशीब पलटणार. मागच्यावेळच्यी स्थिती आणि आताची परिस्थिती यात खूप फरक आहे.

IPL 2023 मध्ये Arjun Tendulkar ला मुंबईच्या प्लेइंग XI मध्ये संधी मिळू शकते, त्यामागे एक प्रमुख कारण
Arjun Tendulkar
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:05 PM

Mumbai Indians News : इंडियन प्रीमियर लीगमधील अनेक टीम्स सध्या दुखापतीचा सामना करतायत. मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यावेळी लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. बऱ्याच महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला जसप्रीत बुमराह यावेळी आयपीएल 2023 मध्ये सुद्धा खेळणार नाही. जसप्रीत बुमराहच बाहेर होणं, ही टीमसाठी वाईट बातमी आहे. पण त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूंसाठी सुद्धा ही एक संधी आहे.

मुंबई इंडियन्स या लीगमधील यशस्वी टीम आहे. पाच जेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात. कारण टीमचा बॉलिग अटॅक मजबूत नाहीय.

अर्जुनला कशी मिळेल संधी?

बुमराहशिवाय ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाय रिचर्ड्सन सुद्धा संपूर्ण सीजनमधून आऊट झाला आहे. हे दोन खेळाडू बाहेर गेल्यामुळे अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

अर्जुनची निवड करण्याचा मुंबईला काय फायदा?

ऑलराऊंडर अर्जुन तेंडुलकर वर्ष 2021पासून मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहे. मुंबईच्या टीमकडून अर्जुनने अजून डेब्यु केलेला नाहीय. पण यावेळी स्थिती वेगळी आहे. अर्जुनला संधी दिल्यास मुंबईला लोअर ऑर्डरपर्यंत चांगला बॅटिंग लाइनअप मिळेल. त्याशिवाय गोलंदाजीचा पर्याय सुद्धा मिळतो. कॅमरुन ग्रीनला अर्जुन चांगली साथ देऊ शकतो. अर्जुन तेंडुलकरने मागच्या देशांतर्गत सीजनमध्ये चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे त्याला यंदाच्या सीजनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अर्जुनची कामगिरी कशी आहे?

अर्जुन तेंडुलकर यावेळी रणजी ट्रॉफीच्या अनुभवासह आयपीएलमध्ये उतरणार आहे. अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. तो 7 फर्स्ट क्लास सामने खेळलाय. यात 547 धावा ठोकल्या असून 12 विकेट काढलेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुन नऊ टी 20 सामने खेळलाय. यात 12 विकेट आणि 180 धावा आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.