IPL 2023 : CSK चा एक प्लेयर जबरदस्त फॉर्ममध्ये, आयपीएलमध्ये अन्य टीम्ससाठी बनणार काळ
IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या सीजनला सुरुवात होण्याआधी चेन्नईसाठी ही गुड न्यूज आहे. मागच्या सीजनमधील अपयशाची भरपाई तो या सीजनमध्ये करु शकतो. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स बरोबर होणार आहे.
Chennai Super Kings : यंदाचा IPL चा 16 वा मोसम आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेते गुजरात टायटन्समध्ये पहिला सामना होणार आहे. 31 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होत आहे. चेन्नईच्या टीमने मागच्यावर्षी खूपच खराब प्रदर्शन केलं होतं. या सीजनमध्ये दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने चेन्नईची टीम मैदानात उतरेल. चेन्नईच नेतृत्व एमएस धोनीकडे आहे. चेन्नईसाठी एक चांगली बाब आहे. सीजन सुरु होण्याआधीच त्यांचा एक घातक खेळाडू फॉर्ममध्ये आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी हा खेळाडू चालू सीजनमध्ये हुकूमाचा एक्का ठरु शकतो.
मुंबई इंडियन्सपाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. त्यांनी आतापर्यंत चारवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावलं आहे यंदा पाचव जेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने चेन्नईची टीम मैदानात उतरेल.
दुखापतीनंतर मैदानात पुनरागमन
चेन्नई सुपर किंग्सचा जो खेळाडू फॉर्ममध्ये आहे, त्याच नाव रवींद्र जाडेजा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपासून मैदानावर पुनरागमन करताना जाडेजाने कमाल केली. त्याने बॅट आणि बॉलने टीमच्या विजयात महत्वाच योगदान दिलं. दुखापतीवर मात करुन त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये पुनरागमन केलं. जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.
आता उत्तम फॉर्ममध्ये
31 मार्चला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तो चेन्नई टीमकडून मैदानावर खेळताना दिसेल. मागच्यावर्षी जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई टीमची कामगिरी खूपच खराब होती. त्यानंतर त्याने टीमच नेतृत्व सोडलं. रवींद्र जाडेजा आता उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये तो मैदानात कमाल करु शकतो.
टेस्टमध्ये किती विकेट काढल्या?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने चेंडूने कमालीच प्रदर्शन केलं. त्याने 4 कसोटी सामन्यात 22 विकेट काढले. बॅटिंग करताना त्याने 4 सामन्यात 107 धावा केल्या. त्याने ऑलराऊंडर खेळाच प्रदर्शन केलं. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जाडेजाची ही पहिली सीरीज होती.
वनडे सीरीजमध्ये किती धावा?
वनडे सीरीजमध्ये जाडेजाने पहिल्या सामन्यात 45, दुसऱ्या मॅचमध्ये 16 आणि तिसऱ्या सामन्यात 18 धावा केल्या. वनडे सीरीजमध्ये तो बॉलिंगमध्ये प्रभावी वाटला नाही. पण त्याने जबरदस्त फिल्डिंग केली. जाडेजाने चित्याच्या चपळाईने काही झेल पकडले. आयपीएलमध्ये कमालीची रेकॉर्ड
2008 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजाने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी तो विजेत्या टीमचा भाग होता. त्यानंतर जाडेजा कोच्चीकडून खेळला. मागच्या काही वर्षांपासून तो चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतोय. आयपीएलच्या 210 सामन्यात त्याने 2502 धावा केल्या आहेत. इतक्याच सामन्यात त्याने 132 विकेट काढलेत.