Mumbai Indians | रोहितच्या जागी कॅप्टन बनलेल्या हार्दिकसोबत मैदानात असं व्हाव, प्रसिद्ध क्रिकेटपटूची नको ती इच्छा
Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आल. त्याच्याजागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलय. काही माजी क्रिकेटपटूंना सुद्धा हा निर्णय पटलेला नाहीय. ते आपली मत मांडताना नको त्या इच्छा व्यक्त करतायत.
Mumbai Indians | आयपीएल 2024 च्या निम्म्या शेड्यूलची घोषणा झाली आहे. पहिला सामना 22 मार्चला आहे. 5 वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा सामना आपल्या पहिल्या किताबाच्या प्रतिक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार आहे. शेड्यूल जाहीर झालं. पण पहिल्या सामन्यापेक्षा हाइप दुसऱ्या सामन्याची जास्त आहे. हा सामना 24 मार्चला म्हणजे या सीजनच्या तिसऱ्यादिवशी होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. तस बघायला गेलं तर हा फक्त एक सामना आहे. पण अनेक वर्षानंतर मुंबईची टीम एका दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळायला मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आल. त्याच्याजागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलय. हार्दिक मागच्या सीजनपर्यंत गुजरात टायटन्सचा कॅप्टन होता. पण ट्रेड करुन मुंबई इंडियन्सने त्याला आपल्याकडे घेतलं.
आयपीएल सुरु व्हायला अजून महिन्याभराचा वेळ आहे. पण त्याआधीच वातावरण तापू लागलय.खासकरुन हार्दिक पांड्यावर माजी क्रिकेटर्स आणि काही फॅन्स नाराज आहेत. वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यानंतर हार्दिक पांड्या अजून पुनरागमन करु शकलेला नाहीय. गुजरात टायटन्सची टीम सोडल्यापासून फॅन्स आणखी नाराज झाले. माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर आकाश चोपडा यांनी यावरुन हार्दिकला टोला लगावलाय. “हार्दिक पांड्याला अहमदाबादमध्ये चिडवावं, डिवचाव अशी माझी इच्छा आहे. कारण आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये मुंबई आणि कोलकातामध्ये सामना होता. आम्ही वानखेडे स्टेडियमवर खेळत होतो. अजित आगरकर आमच्या कोलकाताच्या टीममध्ये होता. आम्हाला त्याला बाऊंड्री लाइनवरुन हटवाव लागलं, कारण तो मुंबईचा होता. अजित आगरकर मुंबई विरुद्ध मुंबईत खेळत होता. वानखेडेच्या प्रेक्षकांनी त्याला खूप डिवचलं” अशी आठवण आकाश चोपडा यांनी जियो सिनेमाशी बोलताना सांगितली.
‘तसं आता हार्दिकसोबत व्हाव अशी इच्छा’
आता आकाश चोपडाची इच्छा आहे की, काही वर्षांपूर्वी जे अजित आगरकरसोबत मैदानावर झालं, तस आता हार्दिक पांड्यासोबत गुजरातमध्ये झालं पाहिजे. आयपीएल सुरु झाल्यानंतर फॅन्स हार्दिक पांड्यासोबत कसं वर्तन करतात ते दिसून येईलच. पण सध्या हार्दिक अनेकांच्या रडारवर आहे, एवढ मात्र नक्की.