Hardik Pandya : खरंच टीममध्ये एकोपा नसल्याने मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजीला हे सर्व कराव लागतंय का? Video
मुंबई इंडियन्सने IPL 2024 च्या सीजनमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. म्हणून मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजीने एक पाऊल उचललं. पण त्यातून एक प्रश्न निर्माण होतो की, मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये एकोपा नसल्याने हे सर्व कराव लागतय का?
हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये कॅप्टनशिपवरुन कथित मतभेद हा यंदाच्या आयपीएल सीजनमधील चर्चेचा मुद्दा आहे. हार्दिकला कॅप्टन बनवल्यापासून रोहित-हार्दिकमध्ये दुरावा दिसून आलाय. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले, त्यातून दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा करण्यात आलाय. या सगळ्याचा फटका टीमला बसला. मुंबई इंडियन्सला अजूनपर्यंत चालू सीजनमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाहीय. सलग तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालाय. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स तळाला आहे. या दरम्यान टीमच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. MITV वर एक व्हिडिओ आलाय. ते पाहून असं दिसतय की, दोन्ही खेळाडूंमधील मतभेद संपुष्टात आलेत. असं झाल्यास मुंबईच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.
अनेकदा खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक थकवा घालवण्यासाठी गेट अवे ब्रेक दिला जातो. या दरम्यान खेळाडू परस्परांसोबत वेळ घालवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्री भावना वाढते. मुंबई इंडियन्सने सुद्धा आपल्या खेळाडूंना अशीच सुट्टी दिली होती. MITV वर रिलीज एका व्हिडिओमध्ये रोहित आणि हार्दिक ट्रिप दरम्यान परस्परांशी हस्तांदोलन करताना बोलताना दिसले.
एडवेंचर ट्रिप
मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या मोठ्या उत्साहाने इशान किशनला मिठी मारताना दिसला. हार्दिक, बुमराह आणि इशान कमर्शियल शूट दरम्यान एकत्र दिसले होते. इशान मस्करी करत होता. त्यानंतर मुंबईच्या संपूर्ण टीमने एडवेंचर ट्रिप केली. या ट्रिपमध्ये खेळाडूंनी एक्वा एडवेंचरची मजा घेतल्यानंतर संध्याकाळी संगीताचा आनंद घेतला.
That’s one way to unwind and have some quality team time 🤩➡️ https://t.co/GyuukJgUDk
Catch it all on #MIDaily now, available on our website and MI app 📹💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/rwTLt8mMRi
— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2024
मुंबईला कमी समजू नका
गेट अवे ब्रेक दरम्यान मुंबईचे खेळाडू परस्परांसोबत खूप रिलॅक्स, मजा-मस्ती करताना दिसले. मतभेदांच्या चर्चां दरम्यान मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी ही चांगली बाब आहे. कारण खेळाडूंमध्ये बॉन्डिंग वाढल्यास पुढच्या सामन्यांमध्ये टीमच्या प्रदर्शनात सुधारणा होऊ शकते. मुंबई सध्या तळाला आहे. मात्र, मागच्या सीजनमध्ये सुद्धा मुंबईने सुरुवातीचे सामने गमावले. पण त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. 2015 च्या सीजनमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे चार सामने गमावले होते. पण त्यानंतर मुंबईच्या टीमने दमदार कमबॅक केलं. फक्त प्लेऑफच नाही, थेट ट्रॉफीच उचलली होती. सूर्यकुमार यादवच कमबॅक झालय. त्यामुळे मीडिल ऑर्डरमध्ये टीम अजून मजबूत होईल.