IPL 2021 Final: महामुकाबल्यासाठी दोन्ही संघानी जाहीर केले अंतिम 11, चेन्नईकडे प्रथम फलंदाजी
यंदाच्या पर्वाचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोघांच्यातील सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. नाणेफेक जिंकत केकेआरने गोलंदाजी निवडली आहे.
IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाच्या अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) या संघामध्ये खेळवला जाणाऱ्या या सामन्यासाठी अवघा देश उत्सुक आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात धोनीची टोळी कोलकात्याच्या रायडर्सशी दोन हात करणार आहे.
सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकली आहे. केकआरकडे उत्तम बोलिंग अटॅक असल्याने त्याने गोलंदाजी आधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धोनीच्या टोळीला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघानी त्यांचे एक एक दिग्गज खेळाडू बाहेरच बसवले असून मागील सामन्याप्रमाणेच अंतिम 11 ठेवली आहे. केकेआरने आंद्रे रस्सेल तर चेन्नईने सुरेश रैनाला संघाबाहेर ठेवलं आहे.
? Toss Update ?@Eoin16 has won the toss & @KKRiders have elected to bowl against the @msdhoni-led @ChennaiIPL in the #VIVOIPL #Final. #CSKvKKR
Follow the match ? https://t.co/JOEYUSwYSt pic.twitter.com/pK6iBIupcR
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2021
आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे अंतिम 11
केकेआर-इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल् हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपरकिंग्स- फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर.
हे ही वाचा
मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी
KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ
(In IPL Final Between CSK and KKR team kkr Won Toss and choose to bowl first this is Final 11)