KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

दिल्लीला नमवत कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. आता चेन्नई सुपरकिंग्स आणि केकेआरमध्ये शुक्रवारी (15 ऑक्टोबर) आयपीएलचा अंतिम सामना पर पडणार आहे.

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या 'त्रिकुटा'ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ
केकेआर संघ
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 7:45 PM

IPL 2021: बहुचर्चित आणि जगातील अव्वल दर्जाची क्रिकेट लीग असणाऱ्या इंडियन प्रिमीयर लीगची आता सांगता होणार आहे. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) केकेआर आणि सीएसके (KKR vs CSK) यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. एका वेळी गुणतालिकेत अगदी खालच्या स्थानांमध्ये असणाऱ्या केकेआरने अंतिम सामन्यांपर्यंच मारलेली धडक आणि धोनीच्या चेन्नईने काय ठेवलेला क्लास यामुळे ही फायनल चुरशीची होणार यात शंका नाही. पण सध्यातरी दोन्ही संघ रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. त्यात चेन्नई संघाला केकेआरच्या तीन खेळाडूंच्या गोलंदाजीच्या जादूने ग्रासलं आहे.

हे त्रिकुट म्हणजे सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल् हसन. या तिघा फिरकीपटूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा गोलंदाद वरुण यानेतर सर्वात बेस्ट फिरकी गोलंदाजी यंदाच्या पर्वात केली आहे. त्याच जोरावर त्याची आगामी टी20 विश्व चषकासाठीही निवड झाली आहे. तिघांच्या इकॉनोमीचा विचार करता वरुणची इकॉनोमी सर्वात कमी म्हणजे 6.40, त्यानंतर सुनीलची 6.44 आणि अखेर शाकिबची इकॉनोमी 6.64 इतकी आहे. दरम्यान टी20 प्रकारात 7 पेक्षा कमी इकॉनोमी म्हणजे उत्कृष्ट असल्याने सीएसकेची डोकेदुखी वाढली आहे.

चेन्नईसाठी 12 षटकं धोक्याची

केकेआरच्या या त्रिकुटाच्या प्रत्येकी 4 ओव्हर म्हणजेच एकूण 12 ओव्हर या सीएसके संघासाठी फार अवघड ठरतील. तिघांनी आतापर्यंत उत्तम गोलंदाजी केली आहे. वरुणने आतापर्यंत आयपीएल 2021 मध्ये 18 तर सुनीलने 14 विकेट टिपल्या आहेत. शाकिब केवळ 7 सामने खेळला असून त्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या तिघांच्या ओव्हर सीएसकेच्या फलंदाजासाठी धोक्याच्या ठरणार आहेत. त्यात या तिघांनी धोनीलाही बऱ्याचदा बाद केलं असून डॉट बॉल टाकण्यात तिघेही तरबेज आहेत. वरुणने यंदा 144, सुनीलने 125 आणि शाकिबने कमी सामने खेळताही 44 डॉट बॉल टाकले आहेत.

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

(In KKR vs CSK IPL Final KKRs Bowler narine varun and shakib are main danger for team csk)

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.