IPL 2021: कोलकात्यासमोर राजस्थानच्या फलंदाजानी गुडघे टेकले, 86 धावांनी केकेआरचा मोठा विजय

प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या केकेआरने राजस्थानला 86 धावांनी मोठी मात देत प्लेऑफच्या दिशेनेही मोठं पाऊल टाकलं आहे. सामन्यात केकेआरच्या गोलंदाजानी कमाल गोलंदाजी केली.

IPL 2021: कोलकात्यासमोर राजस्थानच्या फलंदाजानी गुडघे टेकले, 86 धावांनी केकेआरचा मोठा विजय
केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 11:14 PM

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या पर्वात (IPL 2021) प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने एक मोठा विजय मिळवत आपलं प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न अजून बळकट केलं आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सला (Rajsthan Royals) 86 धावांनी मात देत मोठा विजय स्वत:च्या नावे केला आहे.

प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलत्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने 171 धावां स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाजी करत 85 धावांवर राजस्थानला सर्वबाद करत 86 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह गुणतालिकेतील चौथ स्थानही त्यांनी कायम ठेवलं असून नेट रन रेटमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या दिल्लीलाही मागे सोडले आहे. विजयानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह सर्व संघ अतिशय आनंदी दिसत होता.

 

शुभमनचं दमदार अर्धशतक

सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानने गोलंदाजी निवडली. त्यामुळे केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीला आला. यावेळी केकेआरची सलामी जोडी व्यंकटेश अय्यर आणि शुभमनने उत्तम सुरुवात करुन दिली. पण 38 धावांवर अय्यर बाद झाल्यानंतर काही फलंदाज लवकर बाद झाले. ज्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र गिलसोबत सामना सांभाळला. दरम्यान सलामीवीर शुभमनने 44 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 56 धावा केल्या. तर त्रिपाठीने 21 धावांची साथ त्याला केली. त्यामुळे  केकेआरने 171 धावांपर्यंत मजल मारली.

केकेआरच्या माऱ्यासमोर राजस्थान गारद

171 या बऱ्यापैकी मोछ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानालर आलेल्या राजस्थान संघाची फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुढे सर्वच फलंदाज अगदी काही धावांत बाद झाले. 40 धावांच्या आत तर 7 फलंदाज तंबूत परतले होते. केवळ राहुल तेवतियाने 44 धावा केल्या पण तो बाद होताच राजस्थान सर्वबाद झाली आणि 86 धावांनी केकेआर विजयी झाली. केकेआरकडून शिवम मावीने 4, लॉकी फर्ग्यूसनने 3 आणि वरुणसह शाकिबने प्रत्येकी 1 विकेट घेतला. तर राजस्थानचा एक गडी धावचीत झाला.

हे ही वाचा

धोनी मैदान हरला, दीपक चहरनं मारलं, भर मैदानात प्रेमाचा सामना कुणी जिंकला? चर्चा त्या Video ची तर होणारच

भारताचा किती द्वेष करणार पाकिस्तान? वर्ल्ड कपच्या जर्सीवर तिसऱ्याच देशाचं नाव

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला…

(In KKR vs RR match Kolkata Knight Riders Won Match against Rajsthan Royals with 86 Runs)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.