MI vs PBKS : मुंबईच्या पंजाबवरील विजयानंतर MI चे चाहतेच नाही, तर संपूर्ण भारतीय क्रिकेट फॅन्स खुश, ‘हे’ आहे कारण
मंगळवारी (28 सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्या मुंबईने पंजाबवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयाबरोबर मुंबईने त्यांची पराभवाची मालिका तोडली.
IPL 2021: आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या पर्वातील 42 वा सामना मंगळवारी अबुधाबीच्या शेख झायद मैदानात खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर (MI vs PBKS) 6 विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघानी उत्तम खेळ दाखवला. आधी मुंबईने 135 धावांमध्ये पंजाबला रोखले. पण त्यानंतर पंजाबनेही मुंबईसारख्या तगड्या फलंदाजी असलेल्या संघाला 136 धावांचे आव्हान सहजासहजी पूर्ण करु दिले नाही.
दरम्यान मुंबईच्या या विजयामुळे त्यांचे चाहतेतर खुश आहेतच पण सोबतच सर्व देशभरातील क्रिकेट फॅन्सही आनंदी आहेत. याचे कारण मुंबई संघाकडून खेळणारा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. 30 चेंडूत धमाकेदार 40 धावांची खेळी पंड्याने करत मुंबईला सामना 1 ओव्हर आणि 6 गडी राखून जिंकवून दिला.
ट्विटरवरही पंड्याची हवा
आगामी टी20 विश्वचषकाआधी (ICC T20 World Cup) हार्दीक पंड्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याने सर्वचजण आनंदी आहेत. विशेष म्हणजे मुंबई सामना जिंकताच ट्विटरवर हार्दीक पंड्या ट्रेन्ड होऊ लागला. अनेक चाहत्यांनी आनंदी होत विविध स्टेटस ठेवले तर काही मीम्स तयार करत पंड्या फॉर्ममध्ये आल्याचा आनंद साजरा केला.
Hardik pandya is back in form finally ???♥️♥️♥️ pic.twitter.com/KQcR7PxIjN
— SURBHI SHARMA?? (@Imsurbhis) September 28, 2021
Hardik Pandya Hitting Winning 6 In IPL
vs RCB (2017) Bowler : Mills
vs PBKS (2021)* Bowler : Shami#MIvPBKS @hardikpandya7 @ImRo45 pic.twitter.com/ZDPcEzXPwS
— ROHIT TV (Rohit Sharma FC™ #RohitSharma #IPL2021 (@rohittv_45) September 28, 2021
A tight slap to all haters of HARDIK PANDYA ?WATTA FINISH pic.twitter.com/2xIMBo3P3x
— SIR CHAHAL⁴⁵❁ #CSK❤️ (@Sirchahal) September 28, 2021
मुंबईची भेदक गोलंदाजी
सामन्यात आधी गोलंदाजीचा घेतलेला मुंबई संघाचा निर्णय गोलंदाजांनी बरोबर करुन दाखवला. पंजाबच्या संघाला 20 षटकात 135 धावांपर्यंतच मजल मारुन दिली. यावेळी मुंबईच्या गोलंदाजानी सर्व फलंदाजाना जेरीस आणलं. केवळ मार्करम (42) आणि हुडा (21) यांची एक उत्तम भागिदारी झाल्याने पंजाबने 135 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान मुंबईकडून पोलार्ड आणि बुमराहने प्रत्येकी दोन आणि राहुल चाहर, कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतला.
पंजाबची कडवी झुंज अपयशी
मुंबईला 136 धावांचे आव्हान पंजाबने दिले होते. मुंबईच्या फलंदाजीतील खोली पाहून हे आव्हान त्यांच्यासाठी क्षुल्लक होते. पण पंजाबच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली. यामध्ये युवा गोलंदाज रवी बिश्नोईने त्याच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहितसह सूर्यकुमारची विकेट घेत मोठी कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला एकही विकेट घेता आली नाही. याशिवाय शमी आणि एलीस यांनी एक एक विकेट घेतली. सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. पण त्याचवेळी शमीच्या एका षटकात पंड्याने 17 धावा ठोकत सामना मुंबईला जिंकवून दिला.
हे ही वाचा
IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय
(In Mumbai Indians win over Punjab Kings Hardik Pandya Back in form made every indian Happy)