PAK vs NZ: न्यूझीलंडच्या कॉन्वेने टिपलेला झेल पाहून सर्वच चकीत, ‘क्रिकेटर कि सुपरमॅन?’, पाहा VIDEO

पाकिस्तानने न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात अप्रतिम गोलंजाजीचे दर्शन घडवले आहे. त्यांनी न्यूझीलंड संघाला 134 धावात रोखलं आहे.

PAK vs NZ: न्यूझीलंडच्या कॉन्वेने टिपलेला झेल पाहून सर्वच चकीत, 'क्रिकेटर कि सुपरमॅन?', पाहा VIDEO
डेवन कॉन्वे
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 10:52 PM

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात झाली असून ग्रुप स्टेजेस सामने संपून सुपर 12 चे सामने सुरु आहेत. सध्या शारजाहच्या मैदानात सुरु असलेला न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New zealand vs Pakistan) सामना अगदी चुरशीच्या स्थितीत आला आहे. पाकने न्यूझीलंडला 134 धावांवर रोखल्यानंतर 135 धावांचे लक्ष्य पूर्ण करतानाही पाकिस्तानला अवघड झालं आहे. यावेळी न्यूझीलंडने उत्तम गोलंदाजी केलीच आहे. पण डेवन कॉन्वेने पाकिस्तानच्या हाफीजचा सीमारेषेवर टीपलेला झेल सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 11 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सॅंटनरने हाफीजला चेंडू फेकला. 11 धावांवर खेळणाऱ्या हाफीजने चेंडू हवेत उडवत षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पार जाण्याआधी धावत येऊन अगदी सुपरमॅन प्रमाणे डेवॉन कॉन्वेने झेल टीपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

आतापर्यंत सामना

सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने भारताविरुद्ध घेतला तसाच गोलंदाजीचा निर्णय घेतल. सामन्यात सुरुवातीला न्यूझीलंडने थोडी चागंली सुरुवात केली. 36 धावांवर गप्टील 17 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डॅरिन मिचेल आणि कर्णधार विल्यममनने एक चांगली भागिदारी केली. दोघांनी अनुक्रमे 27 आणि 25 धावा केल्या. त्यांच्यानंतर डेवन कॉन्वेने ही 27 धावा करत संघाला एक चांगलं टार्गेट मिळवून दिलं. यावेळीही भारताविरुद्ध पाक सामन्याप्रमाणे पाकच्.ा गोलंदाजानी अप्रतिम गोलंजाजी केली. रॉफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शाहीन, इमाद आणि हाफिज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या रिजवानने 33 सोडता एकाही खेळाडूने खास कामगिरी केलेली नाही. आता पाकला 3 ओव्हरमध्ये 24 धावांची गरज असून हातात 5 विकेट्स आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!

मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

(In New zealand vs Pakistan match Devon Conway took stunning catch of Hafeez)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.