Wasim Akram: ‘पाकिस्तानात सोशल मीडियावर मला मॅच फिक्सिर म्हणतात, पण तेच भारतात…’ वसीम अक्रमने काय म्हटलं?

Wasim Akram: वसीम अक्रमला रहावलं नाही, त्याने त्याच्या मनातलं दाखवलं बोलून....

Wasim Akram: 'पाकिस्तानात सोशल मीडियावर मला मॅच फिक्सिर म्हणतात, पण तेच भारतात...' वसीम अक्रमने काय म्हटलं?
Wasim AKramImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 7:10 PM

लाहोर: वनडे क्रिकेटमध्ये 502 विकेट, टेस्टमध्ये 414 विकेट, 1992 वर्ल्ड कप विजयाचा हिरो म्हणजे वसीम अक्रम. पण हाच अक्रम पाकिस्तानात सोशल मीडियावर झीरो आहे. वसीम अक्रमचे हे दु:ख ऑस्ट्रेलियन मीडियासमोर व्यक्त झालं. वसीन अक्रमने एका स्पोर्ट्स चॅनलला मुलाखत दिली. त्याला पाकिस्तानी सोशल मीडियावर मॅच फिक्सर म्हटलं जातं.

करिअरमध्ये आरोप झाले

मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी संपूर्ण करिअरमध्ये माझा पाठलाग सोडला नाही. या आरोपांमुळे वसीम अक्रमला त्याची आत्मकथा लिहावी लागली. वाइड वर्ल्ड स्पोर्ट्सला वसीम अक्रमने इंटरव्यू दिला. “ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारतात माझी महान गोलंदाजांमध्ये गणना होते. पण पाकिस्तानातील सोशल मीडिया जनरेशन मला मॅच फिक्सर मानते” असं अक्रम म्हणाला.

दोषी कोण ठरले?

90 च्या दशकात वसीम अक्रम आणि दुसऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. या खेळाडूंविरोधात लाहोर हायकोर्टाच्या एका कमिशनने चौकशी सुरु केली होती. यात सलीम मलिक, अतर-उर-रहमानसारखे खेळाडू दोषी ठरले होते. कमिशनच्या रिपोर्ट्मध्ये वसीम अक्रमला संशयाचा फायदा मिळाला. त्यामुळे तो सुटला.

अक्रमला कॅप्टनशिपवरुन हटवण्याची शिफारस

लाहोर हायकोर्टाच्या त्या कमिशनने अक्रमला कॅप्टनशिपवरुन हटवण्याची शिफारस केली होती. अशा प्रकारच्या खेळाडूवर सतत लक्ष ठेवलं पाहिजे, असं कमिशनने म्हटलं होतं. त्याच्या संपत्तीची आणि पैशाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. रिपोर्टनंतर वसीम अक्रमला 3 लाखाच दंड ठोठावला होता. वसीम अक्रम 18 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. 2003 मध्ये तो करीअरमधला शेवटचा सामना खेळला.

वसीम अक्रमची क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये गणना होते. आजही या आरोपांमुळे वसीम अक्रम दु:खी होतो.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.